Weather Update: येत्या दोन दिवसांत राज्यातील या भागांमध्ये पावसाची शक्यता
राज्यातील तापमानात घट होत असल्यामुळे गुलाबी थंडी सर्वत्र पडली आहे. यामुळे उन्हाच्या चटक्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. पहाटेच्या वेळी हवेत गारवा निर्माण होत आहे. मात्र राज्यातील तापमानात सध्या चढ उतार होताना दिसत असून राज्याच्या काही भागात येत्या दोन दिवसांमध्ये पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला.
राज्यातील तापमानात घट होत असल्यामुळे गुलाबी थंडी सर्वत्र पडली आहे. यामुळे उन्हाच्या चटक्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. पहाटेच्या वेळी हवेत गारवा निर्माण होत आहे. मात्र राज्यातील तापमानात सध्या चढ उतार होताना दिसत असून राज्याच्या काही भागात येत्या दोन दिवसांमध्ये पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
राज्यात सकाळी थंडी जाणवत आहे. ऑक्टोबर हिटच्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला असला तरीही काही भागात दुपारी उन्हाची तीव्रता जाणवत आहे. तसंच नोव्हेंबर महिन्यात थंडी कमी राहण्याचा अंदाजही हवामान खात्याने दिलेला आहे, त्यासोबतच हवामान विभागाने काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवला आहे .
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनूसार, येत्या दोन दिवसांत सिंधुदूर्ग जिल्ह्यामधील काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस होवु शकतो. तसेच रत्नागिरीमध्ये विजांसह काही ठिकाणी हलक्या सरी पडू शकतात. त्याचबरोबर वारे प्रतितास ३० ते ४० किलोमीटर वेगाने वाहण्याचीही शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे .
English Summary: Chance of rain in these parts of the state in the next two daysPublished on: 02 November 2023, 05:45 IST
कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा
प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.
Share your comments