Maharashtra Rain Update :
सोमवारी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली. पण आज मंगळवारी राज्याच्या बहुतांश भागात ऊन होते. ऑगस्ट महिना संपत आला तरी राज्यात पाऊस नाही. त्यामुळे शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत. यातच हवामान विभागाने उद्या मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
हवामान खात्याने राज्यातील अनेक भागात जोरदार पावसाच अंदाज दिला आहे. उद्या (दि.३०) रोजी मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि नगर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येल्लो अलर्ट जारी केला आहे.
दरम्यान, आज (दि.२९) नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर, जळगाव आणि धुळे या जिल्ह्यांतील काही भागांमध्ये ठिकठिकाणी विजांसह हलका पाऊस झाल्याची माहिती हवामान खात्याने दिली. मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यात पावसाची हजेरी लागली आहे.
Share your comments