Rain News :
राज्यात मागील काही दिवसापासून पावसाची हजेरी आहे. आज गणेश विसर्जनाच्या मुहूर्तावर देखील राज्याच्या बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली आहे. मराठवाडा, कोकण , विदर्भात देखील पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. पुढील पाच दिवस राज्यात हवामान खात्याने पावसाचा अंदाज दिला आहे.
मराठवाड्याच्या बहुतांश भागात काल (दि.२७) रोजी पावसाने हजेरी लावली आहे. बऱ्याच भागात मुसळधार पाऊस झाल्याने नदी-नाले ओसांडून वाहत आहेत. परभणी व हिंगोली जिल्ह्यांत देखील काल चांगला पाऊस झाला आहे. परभणी जिल्ह्यातील ७ आणि हिंगोली जिल्ह्यातील ३ मंडलांत अतिवृष्टी झाल्याची नोंद करण्यात आली आहे. अतिवृष्टीमुळे नाल्यांचे पाणी शेतात शिरल्याने सोयाबीन, कापूस, तूर आणि अन्य इतर पिकांचे नुकसान झाले आहे.
कोल्हापुरात देखील जोरदार पावसाची हजेरी
कोल्हापुरात जिल्ह्याच्या विविध भागात पावसाने हजेरी लावली आहे. या पावसाने अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. कोल्हापूरच्या पश्चिमेकडून जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे कमी वेळात तब्बल १३७ मिलिमीटर पाऊस कोसळला. कमी वेळेत एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची यंदाची पहिलीच वेळ आहे. यामुळे राधानगरी धरणात पाणीसाठा वाढल्याने विसर्ग करण्यात आला.
कोकणात देखील पावसाची हजेरी
मागील काही दिवसांपासून कोकणात पावसाची अधूनमधून हजेरी सुरु आहे. त्यातच उद्याही कोकणात जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची हजेरी कायम सुरु आहे.
Share your comments