Maharashtra Weather Today : राज्यात आणखी दोन दिवस पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. तसंच मागील तीन दिवसांपासून राज्याच्या बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आज (दि.२९) रोजी विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे.
विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात हलक्या पावसाची सरी कोसळण्याची शक्यता आहे. निकोबार बेटांवर मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
राज्यात मागील तीन दिवसांपासून मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात पावसाने हाहाकार माजवला आहे. यामुळे शेतपिकांचे नुकसान झालं आहे. तसंच काढणील्या आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले शेतकरी आता चिंतेत आहेत. पुढील ४८ तास विदर्भातील अकोला, अमरावती, गोंदिया आणि नागपुरात विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे.
दरम्यान, राज्यात आणखी काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसंच तापमानात देखील घट होणार आहे. यामुळे हवेत गारवा राहणार असून बऱ्याच भागात धु्के पाहायला मिळेल.
Share your comments