काही दिवस पावसाने विश्रांती घेतल्यानंतर आता राज्यात पुन्हा पाऊस सक्रिय झाला आहे. पावसाच्या सरी येत्या काळात आणखी तीव्र होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
राज्यात पुढील तीन दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने आजसाठी पुण्यासह राज्यातील 18 जिल्ह्यांना इशारा दिला आहे. मागील आठवड्यात मराठवाड्यासह विदर्भात जोरदार पावसानं हजेरी लावली.
नाशिक आणि पालघर जिल्ह्यात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे नद्या भरून वाहू लागल्या. मुंबईसह पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मात्र गेल्या तीन-चार दिवसांत पावसानं विश्रांती घेतली होती. मात्र आता राज्यात पुढील तीन दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हे ही वाचा
Rice farming: भारीच की; शेतकऱ्यांना भात लागवड यंत्रावर मिळतंय 50 टक्के अनुदान; करा आजच अर्ज
देशात पावसाची परिस्थिति
मंगळवारी जोधपूरमध्ये झालेल्या पावसानं गेल्या 20 वर्षांचा विक्रम मोडला. तिथे उत्तराखंडमध्येही पावसानं जोर धरला असून, हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. उत्तरकाशी, बागेश्वर, नैनीताल देहरादून, चमोली, रुद्रप्रयाग पिथौरागढमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हे ही वाचा
Rice farming: अरे व्वा; आता भात लागवड होणार आणखी सोप्पी, यंत्रामुळे शेतकऱ्यांना दिलासा
या परिसरात दरड कोसळण्याच्या घटनाही घडू शकतात असा इशारा देण्यात आल्यामुळं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे. मध्य प्रदेश, तेलंगाणा, कर्नाटक आणि जम्मू काश्मीरमध्येही जोरदार पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये जम्मू काश्मीर परिसरामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
President Draupadi Murmu: कांद्याच्या दरासाठी थेट राष्ट्रपतींकडे साकडे, देणार 1 टन कांदा भेट
Animal Husbandry: सावधान! जनावरांमध्ये वेगाने पसरतोय लम्पी स्किन डिसीज, अशी घ्या काळजी
२१०० किलो मटन, तेवढेच चिकण, १२०० किलोचे मासे, १३ हजार अंडी, भाजप आमदाराची आखाड पार्टी जोरात..
Share your comments