गेल्या महिन्यात राज्यात पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला होता. अशा अवेळीपावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. आता याबाबत महत्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे पुढच्या 2 दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे.
हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार ईशान्य मान्सून 29 ऑक्टोबर रोजी देशात दाखल होऊ शकतो. त्यामुळे तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकलमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्याचा परिणाम शेजारील राज्यांवरही होईल, त्यामुळे कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्येही पाऊस पडण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांनो हरभरा पिकाची पेरणी 'या' तारखेपासून सुरू करा; मिळेल भरपूर उत्पादन
ईशान्येकडील राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, उत्तर भारतात हवामान कोरडे राहील.विशेष म्हणजे, ईशान्य मान्सूनचा हंगाम ऑक्टोबर ते डिसेंबरपर्यंत सक्रिय असतो, जो देशाच्या दक्षिण-पश्चिम मान्सूनच्या प्रस्थानानंतर सक्रिय होतो. त्यामुळे ईशान्य आणि दक्षिण भारतात मुसळधार पाऊस पडत आहे.
थंडीत रिकाम्यापोटी 'या' 6 गोष्टींचा आहारात समावेश करा; आरोग्य राहील एकदम तंदुरुस्त
ईशान्य मान्सून ऑक्टोबरमध्ये जोरदार पाऊस पडतो, त्यानंतर त्याचा वेग कमी होऊ लागतो. विशेष म्हणजे हा मान्सून तामिळनाडूतून दाखल होतो आणि त्यानंतर येथूनही निघतो. त्याचे मुख्य केंद्र तामिळनाडू आहे. मान्सून दक्षिणेत दाखल होत असतानाच दुसरीकडे उत्तर भारतात सध्या सकाळ-संध्याकाळ थंडी पडू लागली आहे.
हवामान खात्याने आज उत्तराखंड, हिमाचल आणि काश्मीरमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे, तर महाराष्ट्र, गोवा-कोकण आणि ईशान्येतही पावसाची शक्यता वर्तवली आहे.
महत्वाच्या बातम्या
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! किसान क्रेडिट कार्डद्वारे शेतकऱ्यांना मिळणार महत्वाची सुविधा
'या' सहा राशींवर असणार एक महिन्यापर्यंत सूर्यग्रहणाचा प्रभाव; कसे कराल रक्षण? जाणून घ्या
आता खत-पाण्याविना शेती पिकणार; जादूचे गहू बियाणे लॉन्च, जाणून घ्या सविस्तर
Share your comments