मुंबई : मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडत आहे. तर राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये सूर्य आग ओकत असल्यासारखी अक्षरश: उष्णता जाणवत आहे. गेल्या काही दिवसांत मुंबई आणि उपनगरात मोठ्या प्रमाणात उष्णता वाढत आहे. अंगाची लाहीलाही होत आहे. आता मुंबईकरांना हवामान विभागाने इशारा दिला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज मुंबईसह कोकणातील ४ जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. शनिवारपर्यंत मुंबईतील उष्णतेचा पार चढताच राहणार असल्याचं सांगितलं आहे. आधीच ठाणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी तापमान 44 अंशांपर्यंत पोहोचलं आहे.
मुंबईत बुधवारी ३८. ८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. एप्रिल महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात उष्णतेची लाट येईल असा इशारा दिला आहे. मात्र अजून मे महिना जाणं बाकी आहे. घामाचा धारा आणि अंगाची काहीली होत असल्याने मुंबईकर पुरते हैराण झाले आहेत.
ठाण्यातील मुरबाड परिसरात मंगळारी सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली. तिथे पारा 44 अंशांवर पोहोचला आहे. येत्या 48 तासात तापमान आणखी वाढण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे.
जगातील सर्वात महाग बटाटा! किमतीत महिन्याभराचे रेशन येईल, किंमत वाचून डोळे होतील पांढरे
Share your comments