मान्सूनचा परतीचा प्रवास मागील काही दिवसांपासून थांबलेला आहे. मान्सूनची सीमा एकाच भागात कायम आहे. तर राज्यात उन्हाचा पारा वाढतच चालला आहे. तसेच हवामान विभागाने राज्यातील काही भागांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
हवामान विभागाने राज्यातील काही भागांमध्ये आज हलक्या सरी पडतील, असा अंदाज दिला. सिंधुदुर्ग,रत्नागिरी,रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी विजांसह हलका ते मध्यम पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तसेच वाऱ्यांचा वेगही जास्त राहण्याचा अंदाज देण्यात आला आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यातही काही ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो, असेही हवामान विभागाने म्हटले आहे.
मान्सूनचा परतीचा प्रवास आजही थांबलेला होता. महाराष्ट्राच्या बहुतांशी भागातून मॅान्सून परतला आहे. सध्या मान्सून कोकणातील सिंधुदूर्ग जिल्ह्याचा काही भाग आणि विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यातील काही भागात आहे. मान्सूनच्या परतीची सिमा दौलतगंज, कांकेर, रामागुंडम, बिजापूर आणि वेंगुर्ला या भागात कायम होती. तसेच देशातून परतीच्या मान्सूनचा प्रवास सुरु झालेला आहे. राज्याच्या बहुतांश भागातून देखील मान्सूनने माघार घेतली आहे. त्यामुळे राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाका जाणवू लागला आहे. यामुळे लवकरच मॉन्सून राज्यासह संपूर्ण देशातून परतण्याची शक्यता आहे.
Share your comments