Pune News
राज्यात पाऊस नसल्यामुळे चिंता वाढणारी आणखी बातमी समोर आली आहे. ऑगस्ट महिन्यात राज्यात सरासरीच्या उणे फक्त ५८ टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. ऑगस्ट महिन्यात सरासरीच्या फक्त ४२ टक्के पाऊस झाला आहे.
मराठवाड्यात सुरुवातीपासून पासून नसल्याने शेतकरी अधिक चिंतेत सापडले आहेत. मराठवाड्यात फक्त २८ टक्के पाऊस झाला आहे. मध्य महाराष्ट्र आणि कोकणात केवळ ३६ टक्के पाऊस पडला आहे.
जून आणि जुलै महिन्यात राज्यात सरासरी एवढा पाऊस झाला. त्यावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत. पण ऑगस्टमध्ये पावसाने चांगलीच विश्रांती दिल्याने आता सगळ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात जर पाऊस झाला नाही तर पाण्याची भीषण टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.
ऑगस्ट महिन्याच्या उत्तरार्धात सरासरी पेक्षा कमी पाऊस पडणार आहे, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलाय. ८ ते २१ सप्टेंबरदरम्यान महाराष्ट्रात सरासरीइतका किंवा त्याहून जास्त पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
दरम्यान, आज विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांच्या काही भागात जोरदार पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. कोकणातील रत्नागिरी, रायगड पालघर आणि ठाणे जिल्ह्यांच्या काही भागांमध्ये पावसाची सरी पडतील, असाही अंदाज हवामान खात्याने दिला आहे.
Share your comments