हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार राज्यात पावसाची शक्यता दर्शवली होती. सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिउष्णतेचा तडाखा सुरूच आहे. तर दुसरीकडे अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. कोकणाला पावसानं झोडपलं. त्यातून हंगामी पिकांचेदेखील बरेच नुकसान झाले. रत्नागिरी जिल्ह्यात सर्वच तालुक्यांमध्ये सकाळपासून पावसाने हजेरी लावली.
कोल्हापूर जिल्ह्यात मध्यरात्री वादळी वारा आणि विजेचा कडकडाट करत पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यामुळे अनेक झाडं उन्मळून पडली. शिवाय अनेक भागातील वीजपुरवठादेखील खंडित झाला होता. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या कोल्हापूरकरांना रात्र जागून काढावी लागली.सध्या पावसाने विश्रांती घेतली असली तरी पुन्हा पाऊस होण्याची शक्यता दर्शवली जात आहे.
कोल्हापूरकरांना सध्या पिकांच्या नुकसानाला देखील सामोरे जावे लागत आहे. नांदेड जिल्ह्यातील बिलोली, देगलुर तालुक्यात सकाळी अवकाळी पाऊस बरसला. त्याआधी मध्यरात्री उशीराही काही तालुक्यांत अवकाळी पाऊस झाला. यामुळे उन्हाळी पिकांचं नुकसान झालं. पंढरपुरात सुद्धा पहाटेपासून ढगाळ वातावरण निर्माण झालं होत. या भागात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस बरसला.
सोलापुरात झालेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्षबागांचं मोठं नुकसान झालं आहे. कासेगावमधले शेतकरी नामदेव नवले यांच्या पाऊण एकर काढणीला आलेल्या द्राक्षबागेचं यात बरंच नुकसान झालं. यामुळे शेतक-यांवर पुन्हा एकदा आर्थिक संकट ओढवलं आहे.
जम्मू-काश्मीरसारख्या बर्फाच्छादित प्रदेशापासून ते संपूर्ण उत्तर-पश्चिम भारत आणि मध्य प्रदेशपर्यंत उष्णतेची लाट आली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून महाराष्ट्रातही उन्हाचा तडाखा बसतोय. शिवाय हवामान विभागाने मध्य महाराष्ट्र ते विदर्भापर्यंत येत्या आठवड्यात उष्णतेची आणखी तापदायक लाट येण्याचा अंदाज दर्शवला आहे. निरभ्र आकाश आणि कोरड्या हवामानामुळे उष्णतेत तीव्र वाढ होणार असल्याचंही सांगितलं जातंय.
महत्वाच्या बातम्या;
दिलासादायक निर्णय! आता दीड लाख शेतकऱ्यांना मिळणार प्री-पेड मीटर
टोमॅटो उत्पादकांसाठी महत्त्वाचे! पिवळा पर्णगुच्छ रोग आहे टोमॅटोवरील सर्वात नुकसानकारक, योग्य व्यवस्थापन गरजेचे
अखेर पीएम किसान योजनेच्या 11 व्या हप्त्याची तारीख ठरली! 'या' दिवशी होणार पैसे जमा..
Share your comments