सध्या शेतातील पिकांवर अनेक प्रकारचे रोग आले आहेत. यामुळे शेती करणे अवघड झाले आहे. मात्र यावर काही शेतकरी वेगळा उपाय देखील शोधून काढतात. आता ब्लॅक थ्रीप किडीमुळं (Black thrips) मिरची पिकाचं मोठं प्रमाणात नुकसान होतं. कोणत्याच रासायनिक आणि सेंद्रिय उपायांना दाद न देणाऱ्या या किडीवर चंद्रपूर जिल्ह्यातील एका तरुण शेतकऱ्याने उपाय शोधला आहे.
अतिशय स्वस्त आणि प्रभावी उपाय शोधून काढला आहे. यामुळे त्यांचे कौतुक केले जात आहे. पंचाळा इथं राहणाऱ्या सतीश गिरसावळे (Satish Girsawle) या तरुण शेतकऱ्याने आपल्या निरीक्षणातून या किडींचा नायनाट करण्यासाठी एक भन्नाट आयडिया शोधून काढली आहे. याचा आता सर्व शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
त्यानं सौरऊर्जेवर चालणारं यंत्र तयार केलं आहे. हे यंत्र शेतकऱ्यांसाठी मोठं वरदान ठरले आहे. ब्लॅक थ्रीप किडीमुळं महाराष्ट्रासह तेलंगणातील मिरची पिकाचं मोठं नुकसान झालं. तसेच राजूरा तालुक्यातील मिरची पिकाचे देखील मोठं नुकसान झालं. मात्र, ब्लॅक थ्रीपला रोखण्यासाठी कोणत्याही प्रकारचे औषधांचे उपाय आपल्याकडे नव्हते.
डाळींब 251 रुपये किलो, शेतकरी मालामाल
यामुळे शेतकरी चिंतेत होते, यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. ब्लॅक थ्रीप हा निळ्या रंगाकडे आकृष्ट होतो हे आमच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी कृषक स्वराज शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून यावरती काही ट्रायल केल्या. यामुळे त्या यशस्वी झाल्या. रात्री ब्लॅक थ्रीप हा निळ्या रंगाकडे आकृष्ट होतो आणि साठलेल्या पाण्यात पडतो.
त्यामुळं ब्लॅक थ्रीपचं मोठ्या प्रमाणावर नियंत्रण करता येत असल्याची माहिती शेतकरी सतीश गिरसावळे यांनी दिली. याच्या वापरातून शेतकरी मोठा औषधांवरचा खर्च वाचू शकतो असेही त्यांनी सांगितलं. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे. यामुळे शेतकऱ्यांचा खर्च देखील कमी होणार आहे.
नंदूरबार बाजार समितीत मक्याला विक्रमी दर
दरम्यान, संध्याकाळी सहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत सौर ऊर्जेवर चालणारे हे साधे-सोपे उपकरण शेतकऱ्यांच्या पसंतीला उतरले आहे. विविध शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन हा युवा संशोधक शेतकरी व त्याची टीम याचे प्रात्यक्षिक देत शेतकऱ्यांना याबाबत जागृत करत आहे. कमी किमतीत शेतकऱ्यांसाठी हे मोठे वरदान ठरत आहे. याची प्रात्याक्षिके देखील दाखवली जात आहेत.
महत्वाच्या बातम्या;
Aurangabad: कृषिमंत्र्यांच्याच तालुक्यात लम्पीचा कहर, सर्वाधिक जनावरे सिल्लोड तालुक्यात मृत्युमुखी
घ्यायक गाडी, पाण्याला जार आणि चहा, मजुरांना आलेत अच्छे दिन..
कुस्तीगीर परिषदेवर पुन्हा शरद पवारांचाच दबदबा, भाजपला कोर्टाचा दणका
Share your comments