1. बातम्या

"या" जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार पेरणी यंत्र, फवारणी पंप आणि अजून बरेच काही…….! असा करा अर्ज

आपला देश कृषीप्रधान म्हणून जगात ख्यातीप्राप्त आहे, आणि कृषिप्रधान देशाचा पाठीचा कणा म्हणून शेतकरी राजाला संबोधले जाते. देशात शासन दरबारी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबविल्या जातात. राज्यात देखील राज्य शासन आपल्या शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी व त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबवत असते जेणेकरून शेतकरी राज्यांना शेती क्षेत्रात प्रगती साधता येईल व त्यांचे जीवनमान उंचावेल. अशीच एक योजना सोलापूर जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत राबविली जात आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कडबाकुट्टी, पेरणी यंत्र, फवारणी पंप, डिझेल इंजिन, ताडपत्री इत्यादी निम्म्या किमतीत वाटप करण्यात येत आहे. मंगळवारी सोलापूर जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने एका कृषी समितीच्या सभेत या योजनेला मंजुरी दिली.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
FARMERS

सोलापूर जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून या योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वैयक्तिक लाभावर विविध अवजारे निम्म्या किमतीत दिले जाणार आहेत. या योजनेसाठी जिल्हा परिषदेने तब्बल 3 कोटी 19 लाख 42 हजार रुपयांची तरतूद केल्याचे समोर येत आहे. मंजूर केलेल्या निधीतून वैयक्तिक लाभाच्या योजनेसाठी साहित्य वाटप केले जाणार आहे, यासाठीसोलापूर जिल्हा परिषदेचे सभापती माननीय अनिलजी मोटे साहेबांनी मंजुरी दिली आहे. शेतकरी मित्रांनो सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी अनेक दिवसांपासून अशा योजनेच्या प्रतीक्षेत होती आणि सहाजिकच या योजनेमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फायदा मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की कोरूना नामक महाभयंकर आजारांमुळे जिल्हा परिषदेच्या सेस फंडाला कात्री लागली होती, आणि कात्री तब्बल 40 टक्के एवढी मोठी होती त्यामुळे अनुदानावर साहित्य वाटप बंद करण्यात आले होते. मात्र आता राज्याच्या ग्रामविकास विभागाने ही बंदी उठवली आहे. आणि त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना अनुदानावर साहित्य मिळणार असल्याने शेतकरी वर्ग सुखावलेला दिसत आहे.

कसा करणार या योजनेसाठी अर्ज

सोलापूर जिल्हा परिषदेच्या या वैयक्तिक लाभाच्या योजनेत अर्ज करण्यासाठी आपल्या गटाच्या एका सदस्याच्या शिफारस पत्रासह अर्जदाराचा सातबारा आधार कार्ड बँक पासबुक झेरॉक्स एवढे कागदपत्रे जोडावे लागतील त्यानंतर अर्ज हा तालुका पंचायत समितीत जमा करावा लागेल. अर्ज दिल्यानंतर सदर योजनेसाठी जे शेतकरी निवडले जातील त्यांना जे साहित्य हवे असेल ते दुकानातून आपल्या पैशातून खरेदी करावे लागेल साहित्य खरेदी केल्यानंतर दुकानदाराकडून बिल पावती घेऊन ती परत सादर करावी लागेल. पावती सादर केल्यानंतर अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जातील. शेतकरी मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की या योजनेसाठी साहित्याची निम्मी किंमत अनुदान म्हणून दिली जाते.

निम्नलिखित साहित्यासाठी मिळणार अनुदान

  • शेतकरी मित्रांनो पीक संरक्षण अवजारे, तसेच थ्री पिस्टन पंप साठी जिल्हा परिषदेकडून अनुदान मिळणार आहे यासाठी सात हजार रुपये अनुदान मिळणार असून एकूण 307 शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे.
  • बॅटरी स्प्रे पंप साठी देखील 2250 रुपये अनुदान मिळणार असून याचा 155 शेतकरी लाभ घेऊ शकतील.
  • या योजनेत ट्रॅक्टरची देखील अवजारे अनुदानावर दिले जाणार आहेत यामध्ये रोटावेटर पलटी नागर पेरणी यंत्र कल्टीवेटर यांचा समावेश आहे.
  • या योजनेअंतर्गत डिझेल इंजन, पाच व साडेसात एचपी एलेक्ट्रिक पंप, तुषार संच इत्यादी देण्यात येणार आहे यासाठी प्रत्येकी साडेअकरा हजार रुपये अनुदान मिळणार आहे मात्र याचा फक्त 869 शेतकरी फायदा घेऊ शकतात.
  • शेतकरी मित्रांनो या योजनेअंतर्गत कडबाकुट्टी देखील दिले जाणार आहे कडबाकुट्टी साठी 12 हजार रुपये अनुदान असेल व याचा बाराशे आठ शेतकरी लाभार्थी फायदा घेऊ शकतात.
  • या स्कीम अंतर्गत 250 शेतकऱ्यांना ताडपत्री देखील अनुदानावर दिली जाणार आहे यासाठी दोन हजार रुपये शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे.
English Summary: in this districts farmers are getting agri machinery at half price Published on: 13 January 2022, 09:41 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters