शेतकरी चांगल्या प्रकारे शेती पिकवतो, मात्र मार्केट मध्ये चांगला दर नसल्याने त्याचे नुकसान होते. आपल्या शेतामध्ये लावलेली मेथीची भाजी लिलावामध्ये नेण्यासाठी वाहन भाडे करून जाणे आणि लिलावात मिळणारा दर याला एका शेतकऱ्याने पर्याय शोधला आहे.
यामुळे या शेतकऱ्याची चांगलीच चर्चा सुरू आहे. आपल्या स्वत:च्या मालकीच्या आलिशान इंडिव्हर गाडीतूनच मेथीची भाजी शेतकऱ्याने आटपाडीमध्ये शनिवारी भरणाऱ्या आठवडी बाजारामध्ये आणली. शेतकऱ्याने मोठ्याने ओरडून थेट ग्राहकांना भाजी विक्री केली.
यातून त्यांना चांगला नफा कमावला आहे. यामुळे शेतकऱ्यांनी असेच काहीसे केले तर त्यांना तोट्यात जावे लागणार नाही. लिलावात दर न मिळाल्याने शेतकऱ्याने थेट ग्राहकाला मेथीची भाजी विकली. या विक्रीतून शेतकऱ्याला तीन पट दर मिळाला.
नेतेच थकबाकीदार! औरंगाबादचे पालकमंत्री भुमरेंच्या पुत्राच्या नावावर 1 लाख 31 हजारांची थकबाकी
झरे येथील वामन गोरड असे या तरुण शेतकऱ्याचं नाव आहे. त्याने आपल्या आलिशान गाडीतूनच भाजी विक्रीचा निर्णय घेतला. वामन यांनी स्वतः थेट ग्राहकाला भाजी विक्री केल्याने 3 पट अधिकचा दर त्यांना मिळाला.
आपल्या मालाचा दर आपणच ठरवला तरच शेतकरी सुखी होईल, असे म्हटले जाते. याचा प्रत्यय याठिकाणी बघायला मिळाला आहे. यामुळे या शेतकऱ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
50 हजारांचे प्रोत्साहन अनुदानाची दुसरी यादी आली, 'या' दिवशी होणार जाहीर
जमीन, हवामान, मजूर, निसर्ग याचबरोबर हवामान बदलाच्या परिणामाने पिकावर आलेले अनेक रोगांचा प्रादुर्भाव यामुळे शेतकरी वर्ग मेटाकुटीला आला आहे. यामुळे आता त्यांनी असे पर्याय बघितले पाहिजेत, तरच शेतकरी खऱ्या अर्थाने पुढे जाईल.
महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांनो काळजी घ्या! शेतकऱ्यांच्या कृषिपंपाच्या केबलवर मारला जातोय डल्ला..
राज्यात 5 हजार बायोगॅस उभारणार, अनुदानात झाली वाढ
ऊस शेती परवडणार! पठ्याने काढले 50 गुंठ्यांत थेट 120 टन ऊसाचे उत्पादन, वाचा शेतकऱ्याच व्यवस्थापन
Share your comments