शेती व्यवसायातील प्रमुख अडचण म्हणजे पाणीटंचाई होय. काळाच्या ओघात शेतकरी पीकपद्धती सुद्धा बदलत आहेत तसेच कष्ट करण्याची तयारी सुद्धा शेतकऱ्यांकडे आहे मात्र पाणी नसल्याने जमीन पडून राहिली आहे. एकदा की शेतकऱ्याने कोणती बाब मनावर घेतली की तो काहीही करू शकतो हे बीड जिल्ह्यातील पाडळसिंग गावाच्या मारोतीराव बजगुडे या शेतकऱ्याने करून दाखवले आहे. सर्वसामान्य पाणीसाठा साठी शेततळे तयार केले जाते पण या शेतकऱ्याने सुमारे एक एकर परिसरात विहीर च खांदलेली आहे जे की पाच परुस विहीर आहे. ही विहीर खोदण्यासाठी दररोज ८० कामगार, १२ हायवा आणि ८ जेसीबी एवढी यंत्रे लागली जे की सलग ३ वर्ष विहिरीच काम सुरू होत. बजगुडे यांचा पाण्याचा तर प्रश्न मिटला आहेच व ही विहीर नागरिकांसाठी एक पर्यटन स्थळ बनले आहे. विहीर पाहण्यासाठी खूपच लोकांची गर्दी होत असते.
शेतकऱ्याचा नेमका उद्देश काय?
बीड जिल्ह्यातील शेतकरी मारोतीराव बजगुडे याना १२ एकर शेती आहे तसेच त्यांचा मंडपाचा व्यवसाय सुद्धा देखील आहे. पाण्याची टंचाई असल्याने सतत उत्पादनात घट व्हायची त्यामुळे त्यांनी एक योजना आखली. प्रथमता त्यांनी शेततळे घेण्याचा विचार केला मात्र मर्यादित च साठा राहील त्यामुळे त्यांनी शेततळे चा विचार डोक्यातून काढून टाकला आणि एकर एकरमध्ये विहीर काढायची ठरवले. मागील तीन वर्षांपासून विहिरीच काम चालू असून आता कुठे ते पूर्ण झाले आहे त्यामुळे आता पाण्याचा प्रश्न तर मिटला आहे.
२ कोटी रुपये आला खर्च मात्र १० कोटी लिटर पाणी क्षमता :-
एक एकर परिसरात जे विहिरीचं काम चालू होतं त्यासाठी ८० मजूर, १२ हायवा आणि ८ जेसीबीसह पूर्ण तीन वर्षे लागली. विहिरीच पाच परुस काम झाल्यानंतर त्यांनी काम थांबवले जे की पूर्ण एक एकराचा परीघ पूर्ण झाला. या तीन वर्षे चालू असलेल्या विहिरीच्या कामाला मारोतीराव बजुगडे यांना जवळपास २ कोटी रुपये खर्च तर आलाच पण त्या विहिरीत सुमारे १० कोटी लिटर पाणी साचून राहील अवधी क्षमता आहे त्यामुळे त्यांचा आता पाण्याचा प्रश्न तर मिटलाच आहे.
आता भरघोस उत्पादन :-
या पाच परुस विहिरीत २ बोअर घेतल्या आहेत. ज्यावेळी दोन परुस विहीर खोल गेली तेव्हा खडक लागला होता पण तो जिलेटीन च्या साहाय्याने फोडण्यात आला. दोन वर्षे जरी पाऊस नसला तरी या विहिरीतील पाण्याने ५० एकर शेतीचे क्षेत्र भिजू शकते. त्यांनी जाग्यावर ८ एकर मध्ये मोसंबी पिकाची लागवड केली आहे. मारोतीराव याना आता यामधून चांगले उत्पादन देखील भेटणार आहे तसेच भविष्यात होणारी जी पाण्याची चिंता होती ती कायमची मार्गी लागलेली आहे.
Share your comments