कोणताही व्यवसाय सुरु करायचा म्हणजे अनेक अडचणी येतात यात काही शंकाच नाही आणि समजा जो व्यवसाय भारतात नवा आहे तसेच कोरोना काळात हा व्यवसाय येऊन अडकला तर तुम्ही समजू शकता किती त्रास तसेच किती अडचणी सहन कराव्या लागल्या असतील पण या साऱ्या अडचणीना तोंड देत दोन मैत्रिणीनी हा व्यवसाय यशस्वी केला त्यासोबत त्यांनी आपला सिराना मिड ब्रँड सुद्धा तयार केला , मध फरमेन्ट करून अल्कोहोल पेय बनवली जातात हि कल्पना भारतात नवीन आहे पण अश्विनी देवरे आणि योगिनी बुधकर यांनी हा व्यवसाय यशस्वी करून दाखविला . नवीनच सुरु झालेल्या यांचा कंपनीत आता ९ लोक काम करतात आणि पुढे थोड्याच कालावधीत त्यांची टीम ५०-१०० लोकांची असेल असा त्यांचा विश्वास आहे .
मध फरमेन्ट करून अल्कोहोल पेय बनवने हि कल्पना भारतात तर जरा नवीन आहे आणि अल्कोहोल पेय बनवण्यासंबधीत कोणताही व्यवसाय सुरु करायचा म्हणजे त्यासाठी परवाना मिळणे फार कठीण आहे यासाठी अश्विनी देवरे आणि योगिनी बुधकर याना कमीतकमी ८ महीने मंत्रालयाच्या फेऱ्या घाव्या लागल्या पण शेवटी त्यांना यात यश मिळाले . त्यांचा व्यवसामागील मुख्य हेतू हा आहे कि मधुमाशी पालन व्यवसायाला मोठा वाव मिळाला यामुळे शेतकऱ्यांचे सुद्धा चांगला फायदा होणार आणि सस्टेनेबल अल्कोहोलीक पेय तयार करण्यास मोठी मदत मिळेल . महिला म्हणून त्यांनी कधीही माघार घेतली नाही धैर्याने अनेक संकटाना त्यांनी तोड दिले आणि त्या सांगतात त्यांच्या फॅमिलाचा त्यांना बराच सपोर्ट मिळाला यामुळे त्यांनी हे साध्य केलं .
जाणून घेऊ मीड आणि त्याचा वेगवेगळ्या प्रोडक्ट बद्दल
या व्यवसायातील बेसिक प्रोडक्ट आहे मीड ,मीड मध फरमेन्ट करून बनविलेले अल्कोहोलिक पेय आहे जसे फळापासून वाइन बनवतात ,मॉल्टपासून बियर त्याप्रमाणेच मध फरमेन्ट करून मीड बनविले जाते . याचे वेगवेगळे प्रकार आहेत १>मध फरमेन्ट करून मीड बनविली जाते २>मध आणि फळ फरमेन्ट करून मेलोमेल बनविले जाते आणि ३>मध आणि मसाले फरमेन्ट करून मेथेग्लेन बनते . अश्विनी देवरे आणि योगिनी बुधकर यानी सुरु केलेल्या कंपनीत ३ प्रकारचे मेलोमेल बनविले जाते आणि त्यासोबत १ मेथेग्लेन मार्केट मध्ये आणण्यासाठी या मैत्रिणी प्रयत्न करत आहेत . यासाठी परवाना मिळाला असुन त्यांना राज्य उत्पादक शुक्लाची मदत मिळाली आहे.
तयार झालेली अल्कोहोलिक पेय विकताना हॉटेल,रिटेलर ,रेस्तारेंट असो परवान्याची गरज असते यामध्ये भरपूर वेळ जातो. पण आता लॉकडाऊन नंतर यांना प्रोमोशन करणे सोप्प जात आहे आणि नवीन प्रकारातील पेय असल्याने त्यांना मागण्यांही जास्त मिळत आहेत,यांचे टार्गेटेट लोग २५-५० वयोगटातील आहेत ,व लोकांचा या पेयाला चांगला रिस्पॉन्स सुद्धा येत आहे. या व्यवसायातुन चांगला नफा मिळू शकते असे त्याचे मत आहे आणि या दोघी मैत्रिणींनी हे सिद्ध करून दाखविले आहे .
Share your comments