पुणे: पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांनी तयार केलेला शेतमाल पुरंदर हायलँडस् कंपनीच्या माध्यमातून आता जगाच्या बाजारपेठेत दाखल झाला आहे. तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी एकत्र येत या फार्मर प्रोड्यूसर कंपनीची स्थापना केली. यामध्ये शेतकरी तरुणांचा मोठा सहभाग असून हे सर्व तरुण उच्च शिक्षित आहेत. बारा तरुणांनी एकत्र येत पुरंदर हायलँडस् कंपनीची निर्मिती केली आहे. ते शेतीत वेगवेगळे प्रयोग देखील करत आहेत.
याच कंपनीच्या माध्यमातून पुरंदरचं अंजीर, सिताफळ आता जगाच्या बाजारात दाखल झालं आहे. या कंपनीने आणखी पुढचे पाऊल उचलत जीआय-टॅग असलेल्या पुरंदरच्या अंजिरांची ५५० किलोची भारतातील पहिली व्यावसायिक निर्यात हाँगकाँगला यशस्वीरित्या केली आहे. यामुळे पुरंदरच्या अंजीर देशात डंका वाजवू लागले आहेत. हाँगकाँग शिवाय पुरंदरचे अंजीर मलेशिया, कंबोडिया आणि इतर देशांमध्ये निर्यात केले जाणार आहेत, अशी माहिती संचालक रोहन उरसळ यांनी दिली आहे.
दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांनो टेन्शन घेऊ नका... काही मदत लागल्यास लगेच 'या' नंबरवर फोन करा!
याबाबत माहिती देताना रोहन यांनी सांगितले की, या संदर्भात आम्ही 10 फेब्रुवारी रोजी मालाची निर्यात केली होती. त्यावर आयात करणार्या ग्राहकाकडून तपशीलवार चांगला अभिप्राय तर मिळालाच पण त्याने इतर देशांमध्ये देखील पुरंदरची अंजीरांची ऑर्डर देणार असल्याचे सांगितले. पुरंदर हाईलँड्स आणि सायन आग्रिकोस यांच्यातील हा संयुक्त प्रयत्न होता.
त्यांच्या या मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी अतुल्य भारत, पर्यटन मंत्रालयाच्या ‘व्हिजिट इंडिया २०२३’ या मिशनसाठी मालाच्या बॉक्सवर त्याची ब्रँडिंगही केली आहे. जेणे करून जगात याचे नाव होइल. त्यांनी दर आठवड्याला सुमारे ४५०-५५० किलो निर्यातक्षम गुणवत्तेचे अंजीर देण्याचे वचन दिले आहे, असं उरसळ यांनी सांगितलं. मलेशियालाही माल निर्यात करण्याच्या ऑर्डर मिळाल्या आहेत, असंही ते म्हणतात.
पुरंदरचे अंजीर अत्यंत नाशवंत फळ असल्यानं बाजारपेठेची मर्यादा आहे. पुरंदर हाईलँड्सचे संचालक मंडळ जिल्ह्यातील पुरंदर आणि बारामती विभागातील आहेत. ते दर्जेदार अंजीर आणि कस्टर्ड सफरचंदांचं उत्पादन घेतलं जाईल यासाठी देखील काम करत आहेत.
कांदा उत्पादक शेतकऱ्यानं मुख्यमंत्र्यांना रक्तानं लिहलं पत्र; केलं 'हे' महत्वाचं आवाहन
शेतमालाच्या निर्यातीसाठी ते विविध प्रयोग देखील करत आहेत. फळांचे शेल्फ लाइफ जास्त काळ टिकेल याची खात्री करण्यासाठी, त्यांची योग्य पद्धतीने कापणी करणे आणि योग्यरित्या पॅक करणे आवश्यक असल्याचे उरसळ यांनी यावेळी सांगितले आहे.
पुरंदर अंजीर हे नेहमीच अत्यंत नाशवंत मानले जात होते, ज्यामुळे त्याची पोहोच दूरच्या बाजारपेठांपर्यंत मर्यादित होती. त्यावर आमच्या FPC टीम आणि आमच्या भागीदारांच्या संयुक्त प्रयत्न केले, असं रोहन उरसळ म्हणाले. आम्ही आता आमचे ताजे अंजीर जागतिक बाजारपेठेत व्यावसायिकदृष्ट्या व्यवहार्य आणि शाश्वत फार्म-टू-टेबल मॉडेलसह घेऊन जात असल्याचे उरसळ यांनी सांगितले.
पुरंदर हायलँड्स एफपीसी लि. चे संचालक समील इंगळे, गणेश कोलते, सागर लवांडे, अमन इंगळे, अतुल कडलग, सागर धूमाळ , रुपाली कडलग, संपत खेडेकर, रामचंद्र गुरुजी खेडेकर , गणेश जाधव, दिपक जगताप, ज्ञानेश्वर फडतरे यांनी विशेष परिश्रम घेतले. या गोष्टींमुळे माजी पणन संचालक सुनील पवार मार्गदर्शन लाभले.
खळबळजनक बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी बॉम्ब ठेवल्याच्या फोन...
Share your comments