1. बातम्या

खळबळजनक बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी बॉम्ब ठेवल्याच्या फोन...

Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी बॉम्ब ठेवल्याच्या फोनमुळे दिल्लीत एकच खळबळ माजली. 100 या क्रमांकावर पंतप्रधान निवासस्थानी बॉम्ब ठेवल्याचे तब्बल 7 कॉल आले. त्यानंतर सुरक्षा दलांनी कसून तपास सुरु केला. या तपासात धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

पाराजी आबासाहेब शिंदे
पाराजी आबासाहेब शिंदे
Prime Minister Narendra Modi

Prime Minister Narendra Modi

Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी बॉम्ब ठेवल्याच्या फोनमुळे दिल्लीत एकच खळबळ माजली. 100 या क्रमांकावर पंतप्रधान निवासस्थानी बॉम्ब ठेवल्याचे तब्बल 7 कॉल आले. त्यानंतर सुरक्षा दलांनी कसून तपास सुरु केला. या तपासात धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

मोदी यांच्या निवासस्थानी बॉम्ब ठेवल्याचा फोन एका व्यक्तीने केला. 17 आणि 18 फेब्रुवारीच्या रात्रीचा हा प्रकार आहे. पोलीस कंट्रोल रुममध्ये आलेल्या 7 कॉल्समुळे चिंतेचं वातावरण निर्माण झाले. निवासस्थानात अनेक ठिकाणी हे बॉम्ब आपण स्वतः ठेवल्याचा दावा फोन करणारा करत होता. तातडीने पंतप्रधानांच्या घराला सुरक्षा यंत्रणेकडून घेरण्यात आले. निवासस्थानी कसून शोध घेण्यात आला. बॉम्ब विरोधी पथकाने एकेक कोपरा शोधून काढला पण बॉम्ब सापडला नाही.

PM Kisan Yojana: या शेतकऱ्यांना पुढील हप्ता मिळणार नाही, का ते जाणून घ्या

त्याचवेळी दिल्ली पोलिसांकडून हा फोन करणाऱ्याचा शोध सुरु होता. अखेर या आरोपीचा मोबाईल नंबर सापडला, त्याला ट्रॅक करून पकडण्यात आलं. दिल्लीच्या दयालपूर भागातला हा रहिवासी असल्याचं उघड झाले आहे.

रवीद्र तिवारी असं त्याचं नाव आहे. तिवारीचा मोठा भाऊ तीन वर्षे बेपत्ता आहे. त्याच्या पत्नीचे इतर कोणाशी संबंध असल्याचाही त्याला संशय आहे. या सर्वबाबतीत पोलीस काहीच करत नसल्याने त्याने खळबळ उडवून देण्यासाठी हा कॉल केल्याचं सांगितलं जातंय. याआधीही त्याने असे प्रकार केल्याचं उघड झाले आहे.

कांदा उत्पादक शेतकऱ्यानं मुख्यमंत्र्यांना रक्तानं लिहलं पत्र; केलं 'हे' महत्वाचं आवाहन

दरम्यान, फोन करणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर कारवाई करण्याबाबत पावले पोलिसांकडून उचलण्यात आली आहेत. त्याच्या तक्रारीचे पोलीस दखल घेत नव्हते, म्हणून आपण हे पाऊल उचल्याचे या फोन कॉल करणाऱ्यांने सांगितले आहे.

Farmers Monthly Pension: या शेतकऱ्यांना मिळणार मासिक 3000 रुपये पेन्शन, जाणून घ्या संपूर्ण माहिती

English Summary: Phones of bomb planted at Prime Minister Narendra Modi's residence Published on: 21 February 2023, 09:42 IST

Like this article?

Hey! I am पाराजी आबासाहेब शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters