नांदेड येथील अर्धापूर तालुक्याचे निवृत्त वैद्यकीय अधिकारी उत्तमराव इंगळे यांनी आधुनिकतेचा हात धरत पारंपारिक शेतीला फाटा देऊन Dragon Fruit ची शेती करण्यास सुरुवात केली आहे. वैद्यकीय क्षेत्रात तेहतीस वर्षांची सेवा संपल्या नंतर ते शेतीकडे वळले. थायलंडच्या भूमीवर अर्धापूर तालुक्यातील सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी उत्तमराव इंगळे यांनी तेतीस वर्षाच्या सेवानिवृती झाल्यानंतर आपल्या जन्मभूमीत लहान येथे शेती करता आहेत. त्यांची या परिसरात अठरा एकर शेती आहे. त्यामधील दोन एकरा मध्ये त्यांनी अधुनिकशेतीला जोड देत ड्रॅगन शेतीचा प्रयोग यशस्वीरित्या पार केला.
महाराष्ट्रात ड्रॅगन फ्रुट दुर्मिळ समजत असलेलं पण आता शेतकऱ्यामध्ये त्याबाबत जागृती :-
ड्रॅगन फ्रूट हे महाराष्ट्रात अत्यंत दुर्मीळ असणार पीक समजले जाते . साधारनता थायलंड या देशामध्ये याची शेती फार मोठ्या प्रमाणावर केली जाते. या पिकाची लागवड वेली च्या स्वरूपाची असल्या कारणाने शेतात सिमेंटचे खांब उभे करून रोपांची लागवड केली जात असते . लागवडीनंतर 1 वर्षाला फळ लागते .याचे साधारण ता वीस ते पंचवीस वर्षे उत्पन्न घेतले जाते.
हेही वाचा:या शेतकऱ्याने द्राक्षाची बाग तोडून लावले कारले, शेतकऱ्याला लाखो रुपयांचा फायदा
ड्रॅनग फ्रुटला बाजारात चांगला भाव:-
निवडुंगासारख्या दिसणा-या या काटेरी वेलीला जुलै ते नोव्हेंबर या कालावधी दरम्यान फळे येतात. एका झाडापासून तयार वेलाना एका तोदिस 6 ते 8 फळे येतात (एकुण शंभर फळे येतात). एका फळाला त्याच्या दर्जानुसार प्रती किलो शंभर ते दीडशे रुपये भाव भेटतो .हे फळ शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते,यामुळे हे फळ आरोग्यासाठी चांगले असल्याने याला बाजारात चांगली मागणी आहे .
कमी खर्च, परवडणारं पीक:-
जुलै 2019 मध्ये रोपाची लागवड केल्यावर साधारान एका वर्षानंतर फळे लागायला सुरुवात होते. या फळामध्ये लाल रंगाच्या फ्रुटची लागवड केलेली आहे. या पिकावर विशेष करून लाल मुंग्या व बुरशी या रोगाचा प्रादुर्भाव होत. परंतु, खुप कमी खर्चाची फवारणी करून ते लवकर नष्ट केले जाते .व बाकीचा खर्च कमी असल्या मुळे हे पीक परवडणार आहे.कमी खर्च होत असल्या कारणाने, आरोग्यासाठी लाभदायक आहे तसेच बाजारात जास्त प्रमाणात मागणी आहे.कमी खर्चा मध्ये चांगले उत्पन्न ही भेटते. परिसरातील शेतकऱ्यांनी पारंपारिक शेती करत आधुनिक शेतीकडे ही लक्ष द्यावे त्यामुळे उत्पन्नात वाढ होईल, अशी प्रतिक्रिया ड्रॅनग फ्रुटची लागवड शेती केलेले शेतकरी डॉ. उत्तमराव इंगळे यांनी सांगितली .
Share your comments