भारतात फार पूर्वीपासून फुलशेती केली जात आहे. फुलशेतीच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना (Farmer) चांगला बक्कळ नफा देखील मिळत आहे. अल्प कालावधीत काढणीसाठी तयार होत असल्यामुळे कमी वेळेत अधिक उत्पन्न प्राप्त करण्यासाठी शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात फुल शेती करत असतात. पूर्वी फुलशेती (Floriculture) केली जात असे मात्र खूपच कमी प्रमाणात केली जातं असे.
परंतु आता फुलशेती व्यवसायिक स्तरावर केली जाऊ लागली आहे. फुलांना बाजारपेठेत बारामही मागणी असल्यामुळे आता व्यावसायिक स्तरावर फुल शेती केली जातं आहे. अलीकडे शेतकरी बांधव पीकपद्धतीत बदल म्हणून फूल शेतीकडे वळू लागले आहेत. विशेष म्हणजे फुल शेती शेतकऱ्यांना हमखास उत्पन्न मिळवून देत आहे. उत्तर प्रदेश राज्यातील एका शेतकऱ्याने देखील फुलशेतीच्या माध्यमातून चांगला बक्कळ पैसा कमावला आहे.
उत्तर प्रदेश राज्यातील गाझीपूर जिल्ह्याच्या भवर कोळसा खाणीतील शेरपूर गावातील सर्वेश राय राहणारा एक शेतकरी फुलशेतीतून एक नवीन यशोगाथा लिहित आहे. मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, दोन वर्षांपूर्वी सर्वेश पारंपरिक शेती करायचे. ते वाटाणा, गहू, धान, मिरची, टोमॅटो अशी पिके घेत असत, पण हळूहळू पिकाच्या उत्पादनात खर्चात अधिक लक्षणीय वाढ झाली आणि उत्पादन मात्र कमी होऊ लागले.
याशिवाय उत्पादित होणाऱ्या शेतमालाला कवडीमोल दर मिळू लागला. तसेच गंगेला आलेल्या पुरामुळे पिकांची नासाडी मोठ्या प्रमाणात होऊ लागली. या सर्व त्रासामुळे सर्वेश यांची शेतीबद्दलची निराशा वाढतच गेली. मात्र, शेतीचा भ्रमनिरास झाला नाही.
महत्वाच्या बातम्या:
2022 चा पावसाचा अंदाज आला रे…..! 20 मे नंतर भारतात वरूणराजाच आगमन ठरलेलचं; उकाड्यापासून लवकरच आराम
काय सांगता! शेतकऱ्यांना खत खरेदी करण्यासाठी मोदी सरकार देणार 11 हजार रुपये; वाचा
सर्वेश यांना पारंपरिक पिकातून अतिशय कवडीमोल उत्पन्न मिळत होते. मात्र शेतीची अगदी लहानपणापासून आवड होती यामुळे या प्रतिकूल परिस्थितीत देखील त्यांनी हार मानली नाही. त्यांनी शेतीमध्ये काहीतरी वेगळं आणि जरा हटके करायचं ठरवलं आणि या अनुषंगाने पीकपद्धतीत बदल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.
यादरम्यान त्यांना फुलशेती विषयी माहिती प्राप्त झाली आणि मग त्यांनी फुल शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी गांभीर्याने शोधाशोध केली. विशेष म्हणजे या कामात त्यांच्या कुटुंबीयांनी देखील त्यांना साथ दिली. फुल शेती करणे हेतू कृषी तज्ज्ञांकडून झेंडूच्या फुलाची लागवड करण्याचे प्रशिक्षण घेतले आणि आज त्यांना फुलशेतीतून चांगले उत्पन्न मिळत आहे. पारंपरिक पिकांच्या लागवडीपेक्षा अनेक पटींनी नफा मिळत असल्याचे ते नमूद करतात.
फुलशेतीतून मिळतोय कमी खर्चात अधिक नफा
स्थानिक बाजारपेठेत झेंडूच्या फुलांच्या एका माळामागे शेतकऱ्याला 20 ते 25 रुपये मिळतात. 40-45 रुपये भावाने बाजारात विक्री करणारे स्थानिक व्यापारी शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन फुले खरेदी करतात. पूर्वांचल एक्स्प्रेस वेचा देखील त्याला फायदा होत आहे. अधिक भाव मिळावा म्हणून ते आपला माल लखनौला पाठवत आहेत. येथे त्यांना 100 ते 150 रुपये किलोला भाव मिळत आहे.
मित्रांनो प्रगतीशील शेतकरी सर्वेश राय यांनी झेंडूची शेती करण्याचे ठरवले त्यावेळी कोलकाता येथून त्यांनी झेंडूच्या फुलांची रोप मागवली होती. त्यांनी झेंडूच्या फुलशेतीसाठी ठिबक सिंचन प्रणालीची व्यवस्था केली आहे. सर्वेश यांनी आपल्या 14 बिघा शेतजमिनीत झेंडूच्या फुलाची लागवड केली आहे.
सर्वेश यांनी सांगितले की, झेंडूची लागवड त्यांनी ऑक्टोबरमध्ये केली त्यावेळी त्यांना एकूण 10 हजारांपेक्षा कमी खर्च करावा लागला. सर्वेश वर्षातून तीनदा झेंडूची लागवड करतात. फेब्रुवारी-मार्च, जून-जुलै आणि सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये त्यांनी झेंडु शेती करून दाखवली आहे.
उन्हाळ्यात एक आठवडा आणि हिवाळ्यात सुमारे 15 दिवस पाणी द्यावे लागतं असल्याचे ते नमूद करतात. यामध्ये कीटकनाशके आणि खतांचा वापर फारच कमी आहे. यामुळेच त्यांना अधिक उत्पन्न मिळतं आहे. निश्चितच काळाच्या ओघात बदल करत सर्वेश यांनी फुलशेतीतून चांगली कमाई केली आहे. यामुळे ते इतर शेतकऱ्यांसाठी देखील आदर्श ठरत आहेत.
Share your comments