असं म्हणतात की, काहीतरी मोठं करण्याची जिद्द आणि इच्छा असेल तर कोणतेही काम अवघड नसते. गरज आहे ती फक्त मेहनत, समर्पण आणि धैर्याची. असेच एक उदाहरण हरियाणा राज्यातील (Hariyana) पानिपतमधून समोर येतं आहे. जिथे काही मित्रानी एकत्रित येऊन सुगंधी औषधी वनस्पतींची लागवड केली आहे. यातून या शेतकऱ्यांना एकरी सुमारे 50 हजार रुपये उत्पन्न मिळतं आहे.
मित्रानो आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, हरियाणातील पानिपत भागातील पाच शेतकरी मित्रांना पारंपारिक पीकपद्धतीत मोठा घाटा सहन करावा लागला. यामुळे या पाच दोस्तानी शेतीमध्ये जरा हटके करण्याचा विचार केला अन नुकसान भरून काढण्यासाठी सुगंधी औषधी वनस्पतींची लागवड करण्याचे ठरवले. ज्यामध्ये त्यांना मोठे यश मिळाले आहे.
महत्वाच्या बातम्या:
सुगंधी औषधी वनस्पती लागवडीतून किती होत आहे कमाई
सुमारे 25 एकर जमिनीत सुगंधी वनस्पतींची लागवड केल्याचे हे पाच शेतकरी बांधव सांगत आहेत. ज्यामध्ये एकरी 50 हजार रुपयांपर्यंतची चांगली कमाई त्यांना होत आहे. याशिवाय या पाच मित्रांच्या प्रेरणेने आजूबाजूचे अनेक शेतकरी बांधव देखील सुगंधी वनस्पतींच्या लागवडीकडे वळू लागले आहेत.
सुगंधी वनस्पतींची लागवड केव्हा केली
विनोद सिंग राहणार धाबिटेक, मिथन लाल सैनी रा.नारायणगड, बलिंद्र कुमार रा.उझाना, अशोक, रा.नारायणगड, ताराचंद आणि राजेश राहणार गढी या शेतकरी बांधवांनी सुमारे पाच वर्षांपूर्वी सुगंधी वनस्पतींची लागवड सुरू केली होती. विनोद आणि मिथन लाल सैनी सांगतात की, पूर्वी ते भाजीपाला पिकवायचे, पण शेतीतून फारसा नफा न मिळाल्याने खूप नुकसान झाले होते. त्यादरम्यान त्यांनी एका जाणकार व्यक्तीकडून सुगंधी वनस्पतींच्या लागवडीची माहिती घेतली आणि त्यात आपले नशीब आजमावले आणि याचा त्यांना मोठा फायदा झाला असून आता लाखो रुपयांची कमाई होत आहे.
कोणत्या सुगंधी वनस्पतींची लागवड केली?
आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, या पाच मित्रांनी त्यांच्या शेतात तुळस, पुदिना, गुलाब, खसखस आणि मेंथा या पिकाची लागवड केली आहे. याशिवाय त्यांनी आपल्या शेतात विविध प्रकारची झाडेही लावली आहेत. दरम्यान, या सुगंधी वनस्पतींचे तेलही विकत असल्याने चांगला नफा मिळत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
50 हजार रुपये एकरी कमाई
एका एकरात सुगंधी वनस्पती लागवडीसाठी सुमारे 20 हजार रुपये खर्च येतो, त्यात सुमारे 70 हजार रुपयांचा नफा झाल्याचे शेतकरी सांगतात. हे सर्व शेतकरी बांधव आपल्या उत्पन्नातून सर्व खर्च उचलतात आणि एकरी सुमारे 50 हजार रुपयांची बचत करत आहेत.
Share your comments