1. यशकथा

पुण्याच्या शंकर बहिरटांचा कृषी पर्यटनाचा यशस्वी प्रयोग; वाचा यशगाथा

KJ Staff
KJ Staff


पुणे : तुमची कोणत्याही मोठ्या किंवा मध्यम आकाराच्या शहराजवळ शेती आहे का? जर असेल तर हा लेख शेवटपर्यंत वाचा.  पारंपरिक शेतीला थोडे व्यवसायिक रूप दिले तर जास्तीचे उत्पन्न मिळू शकते हे पुण्याजवळील शेतकरी शंकर बहिरट यांनी दाखवून दिले आहे.  या व्यवसायासाठी आपल्याला शेत सोडायची गरज नाही किंवा गावाबाहेर जाण्याची गरज नाही.  विशेष म्हणजे तुम्ही हा व्यवसाय शेतीच करु शकता.  हो, आज आपण अशीच एका यशगाथा जाणून घेणार आहोत ज्यामुळे आपल्याला ही शेतीकडे नव्या दृष्टीने पाहण्याची नजर देईल.

पुणे आणि पिपरी चिंचवड शहराजवळील खेड तालुक्यातील चांबळी गावातील शेतकरी बहिरट यांनी मागच्या वर्षी आपल्या पारंपरिक शेतीला थोडे व्यवसायिक रूप देऊन कृषी पर्यटनाचा यशस्वी प्रयोग केला आहे.  त्यांनी आपल्या सात एकरवरील शेतात ग्रामीण संस्कृतीची ओळख करून देणारे स्वागत कृषी पर्यटन केंद्राची स्थापना केली आहे.  कृषि जागरण मराठीशी बोलताना आपल्या या प्रयोगाविषयी अधिक मानिती सांगताना शंकर बहिरट म्हणतात कि, “ आम्ही या प्रयोगाला २०१९ मध्ये सुरुवात केली.  पुणे आणि पिंपरी चिंचवड दोन्ही शहरे अगदी २५ किमीच्या अंतरावर असल्याने आम्हाला त्याचा फायदा झाला.  मी माझ्या शेतीत हे पर्यटन केंद्र उभारले आहे.

आमचा प्रयत्न हा शेती व्यवसाय कसा चालतो आणि ग्रामीण भागातील लोक कसे जगतात हे दाखवणे आहे.  शहरात राहिल्यांने बऱ्याचवेळा आपलं ग्रामीण जीवनाशी नाळ तुटते.  ती भरून काढण्याचा हा प्रयत्न आहे. आम्ही आमचे लक्ष शालेय विद्यार्थ्यांवर केंद्रित केले आहे.  शाळेत असताना मुलांना क्षेत्र अभ्यास नावाचा भाग असतो.  मुलांना निसर्गाचे दर्शन व्हावं, त्यांना ग्रामीण जीवन कळावे म्हणून आम्ही विशेष व्यवस्था करतो.”

 ते पुढे सांगतात कि, मुलांना आम्ही ज्या हंगामात जी शेतीची कामे चालू आहेत त्याची माहिती देतो. आपल्याला जेवणात मिळणारे अन्न कसे तयार होते याची माहिती देतो. आम्ही शेतात देशी फळझाडे लावली आहेत. त्याचीदेखील माहिती देण्यात येते. जेव्हा पर्यटक किंवा ही मुले येतात तेव्हा पर्यटनाची सुरुवात शिवार फेरीने होते. पर्यटकांना खेळण्यासाठी मैदान तयार आहे. मोठ्या मुलांना त्यांच्या शिक्षकांबरोबर बैलगाडीची फेरी मारण्यात येते. मैदानात पारंपरिक पद्धतीचे विटी दांडू, लागोर्या, असे खेळ शिकवले जातात. तसेच क्रिकेट व्हॉलीबॉलदेखील आहेत.
याशिवाय ज्या पर्यटकांना मुक्कामासाठी यायचे असेल त्यांच्यासाठी टेन्ट अर्थात तंबूंची सोय करण्यात येते. जर एखाद कुटुंब राहायला आलं असेल तर त्यांच्यासाठी वेगळ्या टेन्टची सोय बहिरट यांच्याकडे आहे.
यातून मिळणाऱ्या उत्पन्नाविषयी बोलताना बहिरट सांगतात कि अजून माझा व्यवसाय पूर्णपणे प्रस्थापित झाला आहे असे मी म्हणणार नाही. परंतु महिन्याला २० हजार उत्पन्न यातून मिळते.

शंकर बहिरट यांच्या कृषी पर्यटन केंद्राची वैशिष्ट्ये

१ ) एकूण ७ एकरात पसरलेलं पर्यटन केंद्र.
२ ) ग्रामीण संस्कृतीशी ओळख करून देण्याचा प्रयत्न.
३ ) प्रत्यक्ष शेतीची प्रात्यक्षिके.
४ ) शाकाहारी आणि मांसाहारी लोकांसाठी वेगवेगळे किचन.
५ ) पारंपरिक खेळ.
६ ) मुक्कामाची सोय.
७ ) राहण्यासाठी टेन्ट अर्थात तंबूची सोय.
८ ) शिवार फेरी, आणि माहिती.

अधिक माहितीसाठी संपर्क

शंकर बहिरट ८४५९१७८५९८

लेखक(पत्रकार) - 

शेखर पायगुडे

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters