1. यशोगाथा

Success Story : हिंगोलीचे कलिंगड काश्मीर वारीला; मिळवला लाखोंचा नफा

रमजान सुरू झाल्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये कलिंगडाला मोठी मागणी असते. हिंगोली जिल्ह्यातील सांडस गावातील शेतकरी विनायक धावंडकर यांनी त्यांच्या एक एकर शेतात कलिंगडाची लागवड केली. गेल्या काही वर्षांपासून विनायक दरवर्षी कलिंगडाचे उत्पादन घेत आहेत.

हिंगोलीचे कलिंगड काश्मीर वारीला

हिंगोलीचे कलिंगड काश्मीर वारीला

रमजान सुरू झाल्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये कलिंगडाला मोठी मागणी असते. हिंगोली जिल्ह्यातील सांडस गावातील शेतकरी विनायक धावंडकर यांनी त्यांच्या एक एकर शेतात कलिंगडाची लागवड केली. गेल्या काही वर्षांपासून विनायक दरवर्षी कलिंगडाचे उत्पादन घेत आहेत.

हिंगोली जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या कलिंगडाला आता थेट जम्मू-काश्मीरमध्ये मागणी आहे. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील सांडस येथील शेतकरी विनायक धावंडकर यांनी १९ टन कलिंगड जम्मू-काश्मीरला विक्रीसाठी पाठवले.

मित्राच्या मदतीने विनायकने बाजारातील सर्व माहिती मिळवली, पण त्याला योग्य बाजारभाव मिळत नव्हता. ही माहिती मिळताच येथील एका व्यापाऱ्याने चांगल्या भावात कलिंगड खरेदी करण्याचे आश्वासन दिल्यानंतर विनायकने कलिंगड जम्मू-काश्मीरला पाठवण्याचा निर्णय घेतला.

महत्त्वाच्या बातम्या :
शेतकर्‍यांसाठी मोदी सरकारने सुरू केली नवीन सुविधा; उत्पन्न दुप्पट करण्यात होणार मदत
एटीएममधून कार्ड शिवाय काढा पैसे; रिझर्व्ह बँकेची मोठी घोषणा

मिळवला लाखोंचा नफा

विनायकने आपल्या शेतातून ३ ते ४ किलो वजनाची सर्व कलिंगड कापून काश्मीरला पाठवण्याची तयारी केली. एकूण 19 टन कलिंगड जम्मू-काश्मीरला पाठवण्याची तयारी करून त्यांनी ट्रकमधून हा कलिंगड जम्मू-काश्मीरला पाठवला.

या कलिंगडाच्या विक्रीतून विनायक यांना एकूण दोन लाख रुपयांचा नफा झाला आहे. हे उत्पादन घेण्यासाठी विनायक यांना एकूण 60 हजार रुपये खर्च करावे लागले. उत्कृष्ट दर्जाचे आणि आकाराचे मोठे टरबूज तयार झाले. भविष्यात मोठ्या क्षेत्रावर टरबूजाची लागवड करण्याचा विनायकचा मानस आहे.

हेही वाचा :
Business Idea : फक्त 10-15 हजार रुपयांत सुरू करा 'हा' व्यवसाय, कमी वेळात लाखोंची कमाई
खूप छान..! उन्हापासून बचाव करण्यासाठी केले हटके नियोजन; सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

English Summary: Success Story: Hingoli watermelon to Kashmir Wari; Got a profit of lakhs Published on: 10 April 2022, 09:38 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters