1. बातम्या

शेतकर्‍यांसाठी मोदी सरकारने सुरू केली नवीन सुविधा; उत्पन्न दुप्पट करण्यात होणार मदत

Krishi UDAN Scheme : आपल्या देशातील सुमारे 55 ते 60 टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. आता मात्र शेतीतील उत्पन्न कमी होत चालले आहे. त्यामुळे शेतकरी कृषी क्षेत्रापासून दूर जात आहेत. यामुळेच अशा परिस्थितीत शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सरकार वेळोवेळी योजना सुरू करत असते.

शेतकर्‍यांसाठी मोदी सरकारने सुरू केली नवीन सुविधा

शेतकर्‍यांसाठी मोदी सरकारने सुरू केली नवीन सुविधा

Krishi UDAN Scheme : आपल्या देशातील सुमारे 55 ते 60 टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. आता मात्र शेतीतील उत्पन्न कमी होत चालले आहे. त्यामुळे शेतकरी कृषी क्षेत्रापासून दूर जात आहेत. यामुळेच अशा परिस्थितीत शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सरकार वेळोवेळी योजना सुरू करत असते.

केंद्र सरकारने ऑगस्ट 2020 मध्ये कृषी उडान योजना (Krishi UDAN Scheme) सुरू केली. पुन्हा ऑक्टोबर 2021 मध्ये, ही योजना अपग्रेड करण्यात आली. आणि त्याला कृषी उडान 2.0 असे नाव देण्यात आले. नाशवंत उत्पादनांची हवाई मार्गे व परदेशात निर्यात करून शेतकऱ्यांना भरघोस नफा मिळवून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

या योजनेचा लाभ घेऊन शेतकरी आपली पिके नासाडी होण्यापासून वाचवू शकतात. येथील शेतकरी आपली पिके परदेशातही सहज विकू शकतात. त्यासाठी शेतकऱ्यांना विमानातील निम्म्या सीटवर अनुदानही दिले जाते.

हेही वाचा :
Breaking : आता शेतकऱ्यांच्या मागे लागणार चौकशी; ज्यांचे उत्पन्न १० लाख आहे त्यांना...
शेतकऱ्यांनो शेतीची उपकरणे घ्यायची असतील तर ही बातमी वाचाच; होईल फायदाच फायदा

योजनेत सहभागी होण्यासाठी पात्रता अन् आवश्यक कागदपत्रे

1) अर्जदार भारताचा कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
2)अर्जदार शेतकरी असावा, तरच त्याला हा फायदा होईल.
3) आधार कार्ड
4) अर्जदाराला शेतीशी संबंधित कागदपत्रे दाखवावी लागतील
5) अर्जदाराने निवास प्रमाणपत्र दाखवायलाच हवे.
6) दोन उत्पन्न प्रमाणपत्रातही अर्जदार दाखवू शकतो.
7) रेशन कार्ड.
8) मोबाइल क्रमांक आदी बाबींची आवश्यकता आहे.

दुग्धजन्य पदार्थ, मत्स्य उत्पादन, दुग्धोत्पादन आणि मांस व्यवसायात गुंतलेल्या शेतकऱ्यांना या योजनेत प्राधान्य दिले जाते. कृषी उडान योजनेत ८ मंत्रालये एकत्र काम करत आहेत. यामध्ये नागरी विमान वाहतूक मंत्रालय, कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग, आदिवासी व्यवहार मंत्रालय, मत्स्यव्यवसाय विभाग, अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय, वाणिज्य विभाग, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभाग, पूर्वोत्तर क्षेत्र विकास मंत्रालय यांचा समावेश आहे.

English Summary: Modi government launches new facilities for farmers; Will help to double the income Published on: 08 April 2022, 05:16 IST

Like this article?

Hey! I am पाराजी आबासाहेब शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters