यशोगाथा ; छत्तीसगडमधील १७३ जणांनी यशस्वी केला सामूहिक शेतीचा प्रयोग

02 May 2020 06:18 PM
संग्रहित छायाचित्र

संग्रहित छायाचित्र


आपण आपली शेत जमीन छोट छोट्या तुकडयामध्ये केली आहे. तर काही ठिकाणी डोंगराळ भागात छोट-छोट्या पट्ट्यात पीक घेतली जातात. अशीच परिस्थीती असलेल्या शेत जमिनीवर छत्तीसगडमधील शेतकऱ्यांनी एक अनोखा प्रयोग यशस्वी केला आहे.  येथील १७३ जणांनी २०० एकराच्या शेत जमिनीत सामूहिक शेतीचा प्रयोग यशस्वी केला.  दरम्यान हा प्रयोग यशस्वी होण्यासाठी तेथील कृषी महाविद्यालय आणि अनुसंधान केंद्रातील शास्त्रज्ञांचा सहयोग या शेतकऱ्यांना  मिळाला.

सामूहिक शेतीचं यश
छत्तीसगडमधील भोंड गावातील १७३ शेतकऱ्यांनी एकत्र येत २०० एकर जमिनीत सामूहिक शेती केली.  या शेतीत शेतकरी  धानासह अन्य इतर पिकांचेही उत्पन्न घेत आहेत.  असा प्रयोग आधीही बस्तरमध्ये करण्यात आला होता.  मका, हरभरा, गहू, आणि इतर भाज्यांची शेतीसाठी तेथील कृषी शास्त्रज्ञांनी मदत केली.  त्यांच्या मदतीमुळे आम्हाला या प्रयोगात यश मिळाले, असे येथील शेतकरी सांगतात.  मागील वर्षी शेतकऱ्यांनी कमी वेळात अधिक उत्पादन देणाऱ्या पिकांची निवड केली होती. शेतकऱ्यांनी  ३० एकरमध्ये मका, २५ एकरमध्ये हरभरा, २० एकरमध्ये गहू, २० एकरमध्ये भाजीपाला यांचे उत्पादन घेतलं.  पहिल्यांदाच इतक्या मोठ्या शेतजमिनीवर भोंडवासियांनी  लागवड केली होती.  या योजनेसाठी ७५ लाख रुपयांचा खर्च आला आहे, पण  आयुष्यभर येथील शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे.

अशी तयार केली शेती
सामूहिक शेती करण्यासाठी कृषी शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्याचं ठरवलं. त्यानंतर त्यांनी शेत जमिनीची निवड केली जेथे शेतकरी व्यवस्थीत शेती करु शकत होते. या शेतीसाठी इंद्रावती नदीच्या पाण्याचा उपयोग करण्यात आला. यासह भटक्या गुरांपासून शेतीचे संरक्षण व्हावे यासाठी कुंपन करण्यात आले.

people from Chhattisgarh got success in collective farming छत्तीसगडमधील १७३ जणांनी यशस्वी केला सामूहिक शेतीचा प्रयोग Mass farming Agriculture Paddy farming Success in mass farming धानची सामूहिक शेती सामूहिक शेतीची यशोगाथा छत्तीसगड
English Summary: success story ; 173 people from Chhattisgarh got success in collective farming experiment

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.