शेती व्यवसायात अपार कष्टाला जर योग्य नियोजनाची सांगड घातली गेली तर निश्चितच यश संपादन केले जाऊ शकते. शेती व्यवसाय हा बारामाही चालणारा व्यवसाय या व्यवसायात देखील इतर व्यवसायाप्रमाणे काळाच्या ओघात बदल करणे अतिशय महत्त्वाचे ठरते. शेती व्यवसायात असाच वर्धा जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने मोठा अमुलाग्र बदल केला आहे.
वर्धा जिल्ह्यातील आदिवासी बहुल गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जोगा गावातील एका शेतकऱ्याने आधुनिकतेची कास धरत बदलत्या काळानुसार बदल स्वीकारीत शेतीमध्ये मोठे देदीप्यमान यश संपादन केले आहे. जोगा गावातील सुशिक्षित युवक शेतकरी सागर गजानन पुरी या अवलिया शेतकऱ्याने संत्रा या फळबागांची लागवड करून लाखो रुपयांचे उत्पन्न कमविले आहे. सागर यांनी त्यांच्या दोन एकर शेत जमिनीत संत्रा बागेची लागवड करून तब्बल दहा लाखांच्या कमाई करण्याची किमया साधली आहे.
Important news :
Onion : कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे आव्हान; नाफेडला कांदा विकु नका; कारण…….
सागर हे उच्चविद्याविभूषित असून त्यांनी पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. मात्र असे असले तरी त्यांना अगदी लहानपणापासूनच शेती व्यवसायात रस होता. यामुळे पदवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी नोकरी करण्याऐवजी शेती व्यवसाय करण्याचे ठरवले.
त्यांच्याजवळ वडिलोपार्जित 20 एकर शेतजमीन आहे. पूर्वी त्यांचा परिवार पारंपारिक पद्धतीने शेती करीत असे. मात्र सागर यांनी यामध्ये मोठा बदल करीत फळबाग लागवडीचा निर्णय घेतला. 2015 यावर्षी सागर यांनी आपल्या वीस एकर शेतजमिनीपैकी 12 एकर क्षेत्रावर संत्रा बागेची लागवड केली.
विशेष म्हणजे या बारा एकर क्षेत्रापैकी त्यांनी दोन एकर क्षेत्रावर इजरायल टेक्निकने संत्राची शेती सुरू केली. उर्वरित शेतीमध्ये सागर यांनी काकडी, टोमॅटो, भेंडी व फुलशेती सुरू केली. काकडी, टोमॅटो व फुलशेतीतून देखील सागर लाखो रुपयांचे उत्पादन घेत आहेत.
दोन एकर क्षेत्रात इजरायल टेक्निकने लागवड केलेल्या संस्था बागेतून त्यांना यावर्षी तब्बल दहा लाखांचे उत्पन्न मिळाले. यामुळे निश्चितच सागर यांच्या चेहऱ्यावर समाधान जाणवत होते. मात्र सागर यांनी यावेळी शेतकऱ्यांच्या समस्यांचा पाढा देतील वाचून दाखवला. सागर यांच्या मते, खंडित विद्युत पुरवठा, मजुर टंचाई, शेतमालाला मिळत असलेला कवडीमोल दर आणि बाजारपेठेची कमतरता यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.
सागर यांनी फक्त पीक पद्धतीत बदल केला असे नव्हे तर शेतीची पद्धतच बदलली. त्यांनी रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय शेतीकडे आपला मोर्चा वळवला. रासायनिक खतांऐवजी सागर यांनी शेतमाल उत्पादन करण्यासाठी शेणखत, कंपोस्टखत यांसारख्या जैविक खतांचा वापर केला. यामुळे सागर यांच्या उत्पादन खर्चात मोठी बचत झाली शिवाय उत्पादनात वाढ आणि उत्पन्नदेखील वाढले. निश्चितच सागर यांनी मिळवलेले हे यश इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
Share your comments