स्ट्रॉबेरी म्हटलं की आपल्यासमोर पहिल्यांदा येतो तो म्हणजे सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर पाचगणी वाई चा भाग. या भागात पर्यटन स्थळे असल्यामुळे तसेच बाहेरून फिरायला येणारे टुरिस्ट यामुळे या भागातील विकास मोठ्या प्रमाणात झाला आहे. या भागात थंड वातावरण असल्याने स्ट्रॉबेरी चे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते.या व्यतिरिक्त राज्यातील अनेक भागात स्ट्रॉबेरी चे पीक सुद्धा घेतले जाते. नाशिक जिल्ह्यात असलेले सुरगाणा या आदिवासी असलेल्या जिल्ह्यात गेल्या 15 वर्ष्यात जबरदस्त बदल घडून आले आहेत शिवाय या भागातील स्ट्रॉबेरी लागवडीखालील क्षेत्र सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे.
स्ट्रॉबेरी व्यवस्थापनाच्या काही महत्वाच्या बाबी:-
स्ट्रॉबेरी लागवडीसाठी 2 गुंठे ते 2 एकर पर्यँत क्षेत्र आवश्यक त्याचबरोबर पाणी आणि खत माती व्यवस्थापन करणे गरजेचे. तसेच थंड हवामान असलेल्या ठिकाणी आणि पाण्याचा निचरा होणारी जमीन आवश्यक, चार फुटी बेड व पॉली मल्चिंग पेपरचा वापर.
सुरगाणा येथील मातीत व हवामानात पिकणारी लाल चुटूक, आकर्षक अशी मोहक करणारी स्ट्रॉबेरी ग्राहकांच्या पसंतीस चांगलीच उतरली आहे. सध्या सुरगाणा च्या स्ट्रॉबेरी ला बाजारात चांगलीच पसंती मिळत आहे. आकर्षक असल्यामुळे या स्ट्रॉबेरी ला परदेशातून सुद्धा मोठी मागणी आहे. त्यामुळे स्ट्रॉबेरी च्या जोरावर येथील आदिवासी कुटुंबाचा आर्थिक विकास होऊ।लागला आहे शिवाय स्ट्रॉबेरी उत्पादनाच्या माध्यमातून बक्कळ नफा सुद्धा ते मिळवत आहेत. त्यामुळे या भागातील आदिवासी लोकांची वणवण कमी झाली आहे. येथील आदिवासी शेती करून स्ट्रॉबेरी पिकवून बक्कळ नफा मिळवत आहेत.
बोरगाव ब्रँड:-
स्ट्रॉबेरी ही दिसायला आकर्षक असल्यामुळे अनेक लोक मोहित होऊन स्ट्रॉबेरी खरेदी करत असतात. तसेच यंदाच्या हंगामात सुरगाण्याची स्ट्रॉबेरी लोकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. सुरगाण्याची स्ट्रॉबेरी ला राज्यात तसेच अन्य राज्यातून सुद्धा मोठी पसंती मिळत असल्यामुळे मागणीत सुद्धा प्रचंड वाढ झाली आहे. सुरगाण्याची स्ट्रॉबेरी खरेदी करण्यासाठी मुंबई गुजरात चेन्नई या राज्यातील व्यापारी वर्ग बांधावर येऊन स्ट्रॉबेरी खरेदी करत आहे.
स्ट्रॉबेरीचा कालावधी नुसार भाव रु. (प्रतिकिलो):
स्ट्रॉबेरी ठराविक महिन्यांमध्ये मिळत असल्याने भाव सुद्धा जास्त असतात डिसेंबर - 200 ते 300, जानेवारी - 150 ते 200, फेब्रुवारी - 80 ते 100 , मार्च - 60 ते 70 , एप्रिल - 35 ते 50 (प्रक्रियेसाठी) असा भाव हा स्ट्रॉबेरी चा राहतो. स्ट्रॉबेरी च्या उत्पादनात वाढ व्हावी म्हणून कृषी क्षेत्रामधून सुद्धा आर्थिक पाठबळ मिळत आहे.
Share your comments