अमरावती मध्ये वास्तव्य असलेले विनय बोथरा यांची धनज येथे शेजतमीन आहे जे की त्यांनी १९८९ मध्ये रोपवाटिका व्यवसाय सुरू केला होता. आजच्या घडीला ते सात राज्यांना सागवान रोपांचा पुरवठा करतात तसेच १५ वर्षांपासून त्यांनी फुलवलेली सीताफळाची बाग. सुमारे ४८ एकरावर ही बाग असून त्यामध्ये खूप जुनी झाडे आहेत. सीताफळ महासंघाचे विनय संचालक आहेत.
सीताफळ शेती:-
१. सुमारे १४ जातींचे संकलन त्यामध्ये मुख्य वाण हा बालानगर आहे.
२. झाडे लावल्यापासून तिसऱ्या वर्षांपासून उत्पादनास सुरुवात.
३. सप्टेंबर ते डिसेंबर असा विक्री हंगाम आहे.
कांचन ब्रॅण्ड लोकप्रिय:-
१. सीताफळाच्या प्रति झाडापासून ३० ते ४० किलोपर्यंत उत्पादन मिळते.
२. विनय यांनी आईच्या नावापासून कांचन ब्रँड विकसित केला आहे.
३. सप्टेंबर ते डिसेंबर या हंगामात रोज २ हजार ते २५०० बॉक्स नागपूर व अन्य मार्केटला जातात.
४. केवळ स्थानिक बाजारपेठेवर अवलंबुण नाही तर दिल्ली, कोलकाता व भुवनेश्वर येथे सुद्धा माल पाठवला जातो.
A आणि B ग्रेड च्या फळांना चांगला भाव मिळतो परंतु लहान म्हणजेच ,१५० - २५० ग्राम च्या फळांना अपेक्षित असणारा भाव मिळत नाही. विनय यांचा मुलगा ऋषभ याने फूड टेक्नॉंलॉजी मध्ये बी टेक केले आहे त्यामुळे प्रक्रियेची जबाबदारी त्याच्याकडे सोपवली आहे. अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने सीताफळाचे गर वेगळे करणारे मशीन तयार केले आहे.
गरनिर्मिती:-
१. शास्त्रीय पद्धत वापरून फळातील गर काढल्यावर ते ब्लास्ट फ्रीझरमध्ये अडीच ते तीन तास ठेवण्यात येतो.
२. बागेमधील फळांचा वापर प्रक्रियेसाठी होतो.
३. सप्टेंबर ते डिसेंबर या हंगामात पाच ते सहा टन गरनिर्मिती होते.
४. ६० अंश सेल्सियस तापमानात गर ठेवल्यास ओलावा निघून जातो.
Share your comments