1. यशोगाथा

छोटीशी हिऱ्याची कंपनी ते स्वतःची डेरी फार्मिंग एक थक्क करणारा प्रवास; आता वर्षाला पंचवीस लाखांची कमाई

जिद्द, काहीतरी वेगळे करून दाखवण्याची इच्छा आणि त्यासाठी कष्ट करण्याची तयारी हे सगळे गुण जर व्यवस्थित असले तर व्यक्तीला यशस्वी होण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
symbolic image

symbolic image

जिद्द, काहीतरी वेगळे करून दाखवण्याची इच्छा आणि त्यासाठी कष्ट करण्याची तयारी हे सगळे गुण जर व्यवस्थित असले तर व्यक्तीला  यशस्वी होण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही.

 भले परिस्थिती कितीही बिकट आली तरी त्यातून मार्ग काढण्याची तयारी अशा व्यक्तींचे असते. काहीतरी वेगळे असे व्यक्ती करतात आणि त्या माध्यमातून एक आदर्श देखील निर्माण करतात. या लेखात आपण अशाच एका हटक्या व्यक्तीची यशाची कहाणी पाहणार आहोत.

 छोटीशी डायमंड फॅक्टरी ते डेरी फार्म

 सुरत मध्ये राहणाऱ्या मगन नकूम या व्यक्तीची यशोगाथा असून मगन हे गरिबीच्या परिस्थितीत वाढले. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने पुढचे शिक्षण घेऊ शकले नाहीत. त्यामुळे  कमी वयातच नोकरी शोधण्यासाठी सुरत येथे आले व येथे आल्यानंतर त्यांनी एका हिऱ्यांच्या  कारखान्यात नोकरी करणे सुरू केले. या ठिकाणी काही दिवस काम केल्यानंतर त्यांच्यासोबत त्यांचे छोटे भाऊ देखील सुरतला आले आणि तो देखील त्यांच्यासोबत काम करायला लागला.

नक्की वाचा:वन्य प्राण्यांकडून पिकांचे नुकसान झाले तर काळजी करायचे कारण नाही; आता सरकारकडून मिळणार नुकसान भरपाई?

या माध्यमातून त्यांनी हळूहळू 2005 मध्ये स्वतःची एक छोटी हिर्‍यांची  कंपनी उघडले.  या कंपनीमध्ये हिरे घासण्याचे काम सुरू केले. त्यांचा हा व्यवसाय हळूहळू चांगला ग्रोथ घेऊ लागला. 2020 पर्यंत त्यांचा धंद्यात चांगला जम बसला. परंतु मध्येच कोरणा ची एन्ट्री झाली आणि लोक डाऊन लागले. त्यामुळे त्यांचे हे काम बंद पडले. सुरुवातीला त्यांना वाटले की लवकर परिस्थिती ठीक होईल परंतु लॉकडाउन वाढतच गेले व त्यांच्या समस्या वाढत गेल्या. मोठ्या प्रमाणात आर्थिक संकट त्यांच्या आयुष्यात उभे राहिले. त्यांचे सगळे बचत देखील संपली. आता काय करावे हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला.

 दोन गाईच्या माध्यमातून सुरुवात

 याबाबतीत मगन सांगतात की, चार वर्षांपूर्वी त्यांनी दोन गाय खरेदी केल्या होत्या. कोरोना काळात कुठलेही उत्पन्नाचे साधन नसल्यामुळे त्यांनी या दोन गाईंचे दूध त्यांच्या आसपासच्या परिसरात लोकांना घरी  पोहोच करणे सुरू केले. कोरोना काळामध्ये दूध देण्यासाठी लोकांना इकडे तिकडे जाणे मुश्कील होते त्यामुळे त्यांचा हा धंदा चांगला चालू लागला. बऱ्याच लोकांची दुधाची मागणी वाढली.

 त्यानंतर त्यांनी अजून दोन गाई खरेदी केल्या. त्यानंतर दूध डिलिव्हरीचे  प्रमाण वाढले व हळूहळू अनेक ग्राहक त्यांना जोडले गेले. अशा पद्धतीने एक एक करत दोन महिन्याच्या आत मध्ये त्यांनी वीस गाई घेतल्या. या कामामध्ये त्यांना त्यांचा भाऊ आणि त्यांची पत्नी यांची मोलाचे सहकार्य मिळाले. लोकांना घरपोच जाऊन दूध तर पुरवलेस परंतु सोबतच तूप बनवून त्याचे मार्केटिंग देखील केली.

नक्की वाचा:महिला आर्थिक विकास महामंडळाचा महिला, शेतकरी आणि उद्योजकांसाठी मोठा निर्णय, आता फायदाच फायदा..

या माध्यमातून त्यांना चांगला नफा मिळू लागला. सद्यस्थितीचा विचार केला तर मगन यांच्या जवळ 75 गाई आहेत.एका दिवसामध्ये 180 लिटर दूध ते विकतात आणि वर्षाला पंचवीस ते तीस लाख रुपये निव्वळ कमाई त्यांना होते. यापासून ते तूप देखील बनवतात व यात तुपाचा पुरवठा ते सुरत सोबतच अन्य राज्यात देखील करतात. डेरी फार्मिंग सोबतच ते ऑरगॅनिक फार्मिंग मध्ये देखील उतरले आहेत. 

घरच्या दहा एकर जमिनीमध्ये त्यांनी ऑरगॅनिक पद्धतीने पिके आणि भाजीपाला देणे सुरू केले आहे. जेव्हा गाईंची संख्या वाढली तेव्हा त्यांना लागणारा चारा देखील जास्त प्रमाणात आणावा लागत असल्याने त्याचा खर्च वाढला. त्यामुळे चाऱ्याचा प्रश्‍न सुटावेत यासाठीत्यांनी घरच्या शेतातचारा पिके घेणे सुरू केले. त्यामुळे गाईंना भरपूर प्रमाणात चांगला चारा मिळाला  आणि शेतीला लागणारे शेणखत  देखील चांगल्या प्रमाणात मिळाले.

English Summary: small diamond factory to dairy farming this is amazing tarvel to this farmer Published on: 04 April 2022, 12:36 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters