1. यशकथा

चक्क ही महिला नर्सरी मधील रोपे विकून वर्षाला करते 3 कोटींची उलाढाल

KJ Maharashtra
KJ Maharashtra
nursery

nursery

पारंपरिक पद्धतीने शेती करून जास्त प्रमाणात फायदा हा मिळत नाही त्यामुळं अनेक लोक शेतीबरोबरच एखादा जोडधंदा हा करतच असतो आणि उत्पादनाचा स्रोत सुद्धा तयार होतो पुणे जिल्ह्यातील एका 52 वर्षीय चौथी शिकलेली महिला वर्ष्याला करोडो रुपयांची उलाढाल करते.हे ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही.

मोठ्या प्रमाणात आर्थिक विकास:

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील राहणाऱ्या मंगल दळवी या चौथी पर्यँत शिकल्या आहेत. परंतु चौथी शिकून सुद्धा त्या इंग्लिश मध्ये फाडफाड रोपांची नावे घेतात.एवढच न्हवे तर वर्षांला त्या नर्सरीमधील विविध वाणाची रोपे विकून प्रत्येक वर्ष्याला 3 कोटी रुपयांची उलाढाल करतात. लहानपणापासून शिक्षणाची आवडत होती परंतु त्यांना पुढं शिकता आलं नाही तसेच त्यांच्या रोपवाटिकेच्या छंदामुळे त्यांची चांगलीच घडी बसली. त्यामुळे त्यांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक विकास सुद्धा झाला आहे.

हेही वाचा:कुशीनगरच्या(उ. प्र.)कृषी वैज्ञानिकाने तयार केल्या गव्हाच्या 20 नव्या प्रजाती

सुरवातीला मंगल दळवी यांचा भाऊ रोपवाटिकेचे प्रशिक्षण घेत होते. त्यावेळी मंगल दळवी सुद्धा त्यांना कामात मदत करू लागायचे. त्यामुळं त्यांना या कामात चांगलीच आवड निर्माण झाली नंतर लग्न झाल्यावर छंद जोपासन्यासाठी मंगल दळवी यांनी आपल्या नवऱ्याला रोपवाटिका व्यवसायाबद्दल माहिती दिली आणि परवानगी मिळाळ्यावर त्यांनी 5 गुंठे जमिनीत त्यांनी गुलाबाची रोपे फुलवली. असे करता करता त्यांचा व्यवसाय वाढू लागला. आणि हीच उलाढाल 3 कोटी पर्यँत गेली.

तसेच या रोपांसाठी त्यांना देशाच्या विविध  कोपऱ्यातून  मागणी  वाढू  लागली. बघता बघता हा व्यवसाय  10 एकर क्षेत्रामध्ये पसरला.तसेच या रोपवटीकेमुळे 40 लोकांना आपला रोजगार मिळाला आहे. शिवाय परिसरातील अनेक  व्यक्तींना ते रोपवटीकेचे प्रशिक्षण सुद्धा देत असतात. जर का आपल्याला आपल्या आयुष्यात यशस्वी होयचे असेल तर कोणत्याच डिग्री ची आवश्यकता नाही. हे मंगल दळवी यांच्या परिश्रमातून दिसून येते.

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters