सफरचंद फळ बघताच किंवा या फळांचे नाव ऐकताच आपल्या डोळ्याच्या समोर किंवा मनात येते ते म्हणजे काश्मीर. बहुतांश सफरचंद हे फळ काश्मीर मध्ये पिकते. परंतु आपल्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद मध्ये सुद्धा आता काश्मिरी सफरचंदाची बाग फुलली आहे.
उस्मानाबाद हा जिल्हा दुष्काळी जिल्हा आहे:
उस्मानाबाद जिल्ह्यातील जागजी तालुका येथील प्रसिद्ध प्रगतशील असणारे शेतकरी राम सावंत यांनी आपल्या रानात काश्मिरी सफरचंदाचे लागवड आणि उत्पादन घ्यायला सुरुवात केली आहे.आपल्या महाराष्ट्र राज्यातील इतर वेगवेगळ्या भागात सुद्धा आता सफरचंदाची लागवड करायला सुरुवात केली आहे. प्रामुख्याने उस्मानाबाद हा जिल्हा दुष्काळी जिल्हा आहे. या जिल्ह्यात अनेक प्रगतशील शेतकरी सुद्धा आहेत. या जिल्ह्यातील शेतकरी आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करून आपल्या रानामध्ये सोने पिकवत आहेत.
हेही वाचा:त्रिपुराच्या युवा शेतकऱ्याची कमाल, काश्मिरी सफरचंदाच्या लागवडीतून 6 लाखांची कमाई
असेच या मध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी राम सावंत, तानाजी सावंत आणि प्रमोद सावंत यांनी आपल्या रानात काश्मिरी सफरचंदाची लागवड केली आहे.आपल्या मते सफरचंद हे फळ फक्त थंड काश्मीर सारख्या प्रदेशात येते. परंतु उस्मानाबाद येथील शेतकऱ्यांनी हे विधान चुकीस ठरवले आहे. कारण उस्मानाबाद हा जिल्हा दुष्काळी जिल्हा आहे. आणि या सावंत बंधूनी या जिल्ह्यात सफरचंदाची बाग फुलवून जगापुढे एक चॅलेंज ठेवले आहे.
सावंत बंधूनी 2018 साली आपल्या रानामध्ये 210 झाडांची लागवड केली आहे. परदेशातून आणलेली ही रोपे त्यांनी नाशिक मधून आणली होती. याचबरोबर याच्या आधी सावंत बंधूनी ड्रॅगन फ्रुटची शेती करून नावलौकिक मिळाला आहे. तसेच ते एक प्रगतशील शेतकरी असल्याने ते नेहमी आपल्या रानामध्ये विविध प्रयोग करत असतात.सफरचंदाच्या शेतीतून आलेला अनुभव त्यांनी सांगितला आहे की, सफरचंद ची पानगळ ही मोठी गोष्ट असून त्यावर इथरेल नावाचे औषध फवारावे. तसेच यंदा जानेवारी महिन्यात त्यांच्या बागेत फळे आली होती. असेच त्याने पूर्णपणे पारंपारिक शेतीचा त्याग करून नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करत आहेत.
Share your comments