
innovative experiment young farmer rocky soil
हिंगोली जिल्ह्यातील पांगरा शिंदे येथील शेतकरी सोपान शिंदे यांना सात एकर शेती आहे. त्यांनी पारंपरिक शेतीबरोबर आधुनिक शेती करण्याचा निर्णय मध्यंतरी घेतलेला असून, त्यांनी शेतात परसबाग केली आहे. मेहनत केल्यास खडकाळ जमिनीमध्येही अत्यंत कमी पाण्यावर पेरू फळबाग यशस्वी होते, लाखो रुपयांचे उत्पन्नही मिळते, हे त्यांनी दाखवून दिले आहे.
त्यांना कृषी विद्यापीठाने अनेक पुरस्कार देऊन गौरविले आहे. त्यांच्याकडे ५० प्रकारची झाडे आहेत. यामध्ये आंबा, नारळ, ॲपल, फणस आदी झाडांचा समावेश आहे. तसेच त्यांनी रेशीम शेती देखील करून यात चांगले उत्पन्न मिळविले आहे. अनेक शेतकऱ्यांना त्यांनी या संदर्भात मार्गदर्शन करुन गावात पन्नास ते साठ शेतकरी तयार केले आहेत.
तीन वर्षांपूर्वी त्यांनी खडकाळ जमिनीमध्ये अत्यंत कमी पाण्यावर एका एकरात पेरूची लागवड केली होती. पहिल्या वर्षीच सोपान शिंदे यांना पेरू बागेतून उत्पन्न मिळण्यास सुरवात झाली. पहिल्या वर्षी तीन क्विंटल पेरू निघाले, यामध्ये त्यांना खर्च जाता १५ ते २० हजार रुपये उत्पन्न मिळाले. दुसऱ्या वर्षी ९० हजार ते एक लाख तर यंदा आठ क्विंटल पेरूची जागेवरून विक्री करत त्यांना सव्वालाख रुपये मिळाले आहेत.
शेतकऱ्यांना दिलासा! ६.३३ लाख शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे ६७५ कोटी मंजूर..
शिवाय पेरूला आंध्र प्रदेश राज्यातून मोठ्या प्रमाणात मागणी असून, चांगला भाव मिळाला आहे. शेतीमध्ये वेगळा प्रयोग करण्याची जिद्द मनी बाळगत खडकाळ जमिनीत पेरूची बाग घेतली. यासाठी योग्य नियोजन व कृषी विभागाचे मार्गदर्शन मिळाल्याने प्रयोग यशस्वी झाला आहे. शेतीमध्ये मेहनतीला फळ नक्कीच मिळते. असेही त्यांनी सांगितले.
काय सांगता! दिवसाला 33.8 लीटर दूध देणारी म्हैस; देशात ठरली नंबर १, अनेक पुरस्कारही नावावर...
त्यांचा उपक्रम पाहून परिसरातील अनेक शेतकरी प्रभावित झाले आहेत. आता पांगरा शिंदे भागातील इतर शेतकरी देखील ‘विकेल ते पिकेल’ हे धोरण अंगीकारण्याचा प्रयत्न करून पेरू, सीताफळ फळबाग लागवडीकडे वळले आहेत. याचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे.
महत्वाच्या बातम्या;
या गावातील प्रत्येक शेतकरी करोडपती, प्रत्येकाकडे आलिशान घर महागडी वाहने, एका पिकाने बदलले नशीब
माती मधल्या कर्बचक्राचे कार्य
शेजाऱ्यांनो वीजचोरीची माहिती द्या आणि मिळवा बक्षीस! महावितरणकडून अनोखी युक्ती
Share your comments