महिलेने दाखवला सेंद्रिय शेतीचा मार्ग; आता होतोय तीन हजार शेतकऱ्यांना फायदा

22 April 2020 07:13 PM


अधिक उत्पन्न मिळावे यासाठी आपण शेतात  रासायिनक खतांचा आणि केमिकल्सचा मोठ्या प्रमाणात वापर करत असतो.  पण  यामुळे जमिनीची सुपिकता कमी होत असते.  रासायनिक शेतीतून पिकलेला शेतमाल  आरोग्यासाठी हानीकारक असतो.  परंतु काही शेतकऱ्यांना ही बाब समजली असून त्यांनी आपल्या शेतीत बदल केला आणि  सेंद्रिय शेतीचा मार्ग अवलंबला.  अशाच शेतकऱ्यांची कहाणी आम्ही आपणास सांगत आहोत, ही यशोकथा आहे हिमाचल प्रदेशातील शिमलामधील गावाची. या गावाचे नाव आहे, पंजयाणू.  या गावाचे वैशिष्ट्ये म्हणजे येथील सर्वच शेतकरी नैसर्गिक पद्धतीने शेती करतात.  साधारण ४० बिघ्याच्या शेत जमिनीवर नैसर्गिक पद्धतीने म्हणजेच सेंद्रिय पद्धतीने  शेती केली जात आहे.  येथील महिलेच्या पुढाकाराने या शेतीला चालना मिळाली आहे.

महिलेनं दाखवला मार्ग
या गावाच्या परिसरातील शेतकरी नैसर्गिक पद्धतीने शेतीचा फायदा घेत आहेत. याआधी या गावात रासायनिक खतांचा वापर करुन शेती केली जात होती. या गावात राहणारी लिना नावाच्या महिलेने रासायनिक शेतीला विरोध करत गावकऱ्यांना सेंद्रिय शेतीची कल्पना दिली आणि त्याचे फायदे सांगितले. पुर्ण राज्यात त्याच उदाहरण दिले जाते.

अशी होतात कामे
परिसरातील सर्व महिला आपल्या शेतातील कामे आणि घरातील कामे संपवून एका ठिकाणी जमतात.  येथे त्या आपल्या गुरांचे शेण आणि मूत्र, घरातील भाजीपाल्याचा कचरा एकत्र करतात.  यासर्व गोष्टी एकत्रितपणे जीवामृत, घंजीवामृत आणि अग्निअस्त्र सारखी औषधे तयार करतात.
प्रयत्नाना येऊ लागले यश -
महिलांच्ंया प्रयत्नांना यश येत आहे. शेतकऱ्याच्या उत्पन्न दुप्पट झाले आहे.  एका बाजुला उत्पन्न वाढले तर दुसऱ्या बाजुला रासायनिक खते आणि औषधांवरील खर्च कमी झाला.  अशा शेतीमुळे पर्यावरणाला आणि शेतकऱ्यांना कोणतीच हानी होत नाही.  या गावाचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवून जिल्हयातील तीन हजार शेतकरी नैसर्गिक शेती करु लागले आहेत.  या शेतीमुळे लोकांना पौष्टीक भाजीपाला मिळत आहे. शेतकऱ्यांना नवी ओळख या शेतीच्या माध्यमातून मिळत आहे.  शिवाय शेतीवर खर्चही कमी येत आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

farmers and organic farming organic farming and profit शेतकरी सेंद्रिय शेती सेंद्रिय शेतीचा फायदा महिलेमुळे तीन हजार शेतकऱ्यांना झाला फायदा
English Summary: one woman show path of organic farming ; now three thousand farmer getting benefits

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.