माणूस आपल्या प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर या जगतात कुठली ही अशक्य गोष्ट शक्य करू शकतो. याचेच एक उत्तम उदाहरण मराठवाड्यातून समोर आले आहे. शेती क्षेत्रातून देखील करोडोंची उलाढाल करता येणे आता शक्य झाले आहे, याचाच प्रत्यय एका शेत मजुराने जगापुढे मांडला आहे. एकेकाळी शेतात सालगडी म्हणून शेत मजुरी करणारा शेतकरी आजच्या घडीला तब्बल सहा कोटींची उलाढाल करत आहे. या शेतकऱ्याचा हा प्रेरणादायी प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत.
हे देखील वाचा:- अरे व्वा पाजी! धर्मेंद्र करत आहेत शेती, सध्या वावरात लावले आहेत कांदे आणि आता बटाटे लावण्याची तयारी
शेती क्षेत्रात जर आधुनिकतेची कास धरली तर एखाद्या उद्योगपती प्रमाणे कमाई करता येणे शक्य आहे, एकेकाळी दुसऱ्यांच्या शेतात सालगडी म्हणून काम करणारा शेतमजूर आज करोडपती झाला आहे. मराठवाडा व विदर्भ या सीमेवर मौजे पानकरेगाव येथील रहिवासी शेतकरी संतोष शिंदे यांनी तब्बल सहा कोटींची उलाढाल करत शेती क्षेत्रात मोठे यश संपादन केले आहे. एकेकाळी दुसऱ्याच्या शेतात शेतमजूर म्हणून काम करणाऱ्या संतोष यांनी सध्या आपल्या आठ एकर शेतात रोपवाटिकेची निर्मिती करून मोठा नफा अर्जित केला आहे.
हे देखील वाचा:-सावधान! 'या' शेतकऱ्यांना लागला लाखोंचा गंडा; 60 लाखांचे 'चंदन' लावून 'चंदन' लागवडीसाठी अनुदान देणारे फरार
एकेकाळी संतोष दुसऱ्यांच्या शेतात शेतमजुरी करत, या समवेतच आपल्या जिद्दीच्या जोरावर संतोष यांनी एक गुंठा क्षेत्रात नर्सरीची पायाभरणी केली. एक गुंठ्यात उभारलेल्या नर्सरीमध्ये संतोष यांनी झेंडूच्या रोपट्यांची लागवड केली होती, त्यामध्ये त्यांना चांगले नेत्रदीपक यश प्राप्त झाले. झेंडूच्या रोपवाटीकेतून संतोष यांना चांगला मोठा नफा प्राप्त झाला. केवळ एका गुंठ्यात चांगले उत्पादन प्राप्त झाल्याने संतोष यांनी नर्सरी चा व्यवसाय वाढविण्याचे स्वप्न बघितले आणि त्या अनुषंगाने त्यांनी कष्टाची पराकाष्टा करून सर्वप्रथम पाण्याचे नियोजन आखले. पाण्याचा साठा तयार करण्यासाठी त्यांनी सर्वप्रथम आपल्या शेतात विहीर खोदली.
त्यांनी जवळपास 60 फूट खोल विहिरीत खोदून पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवला. त्यांच्या विहिरीला चांगले पाणी लागल्याने त्यांना साडेचार लाख लिटर पाण्याची साठवणूक क्षमता उपलब्ध झाली. एक गुंठ्या क्षेत्रापासून सुरू केलेली नर्सरी हळूहळू वाढवीत संतोष यांनी आता तब्बल आठ एकर क्षेत्रावर नर्सरी फुलवली आहे. संतोष यांनी आधुनिकतेचा वापर करून आपल्या आठ एकर क्षेत्रात आता मिरची, झेंडू, पपई, टोमॅटो, टरबूज, खरबूज यांसारख्या इत्यादी पिकांच्या रोपांची निर्मिती सुरू केली आहे.
हे देखील वाचा:-अरेच्चा! एका एकरात 'या' 120 झाडांची लागवड करा आणि बना करोडपती; जाणुन घ्या याविषयी
संतोष यांच्या 8 एकर क्षेत्रावर असलेल्या नर्सरीत आजच्या घडीला तब्बल शंभर कामगार काम करीत आहेत, एकेकाळी सालगडी म्हणून काम करणारा हा अवलिया आजच्या घडीला शंभर लोकांना रोजगार पुरवीत आहे. 8 एकर नर्सरीतून संतोष यांना आता वर्षाकाठी करोडोंचे उत्पादन प्राप्त होते. संतोष यांच्या मते त्यांची आजच्या घडीला उलाढाल 6 कोटी वार्षिक एवढी आहे.
संतोष यांच्या नर्सरी ची सर्वात मोठी विशेषता म्हणजे, ते आपल्या नर्सरीत उत्पादित केलेले रोपे ग्राहकांना होम डिलिव्हरी मार्फत थेट घरी सुपूर्द करत असतात. यासाठी त्यांनी चार ट्रक ग्राहकांच्या सोयीसाठी उपलब्ध करून दिले आहेत. ग्राहकांना होत असलेल्या या सुविधेमुळे संतोष यांच्या नर्सरीचे पंचक्रोशीत मोठे नाव आहे. एवढेच नाही संतोष यांच्या नर्सरीत उत्पादित केले जाणारे रोपटे चांगल्या दर्जाची असल्याने त्यांच्या रोपांना विशेष मागणी आहे. त्यामुळे संतोष यांचा नर्सरी व्यवसाय रात दोगुणी दिन चौगुणी प्रगती साधत आहे.
Share your comments