1. यशोगाथा

म्हाताऱ्या दाम्पत्यांची कमाल! जिथं गवत सुद्धा उगवत नाही अश्या खडकाळ जमिनीत फुलवली केशर आंब्याची बाग

आपला भारत देशाला कृषी चा वारसा लाभला आहे त्यामुळे 90 टक्क्यांपेक्षा जास्त जनता ही शेती व्यवसाय करत आहे. शेती करताना शेतकरी बांधवांपुढं अनेक वेगवेगळी संकटे येत असतात त्यामध्ये वातावरण झालेला बदल, अवकाळी पाऊस, रोगराई इत्यादी मुळे शेतकरी अडचणीत येत आहे. त्यामुळे शेती घाटयाचा व्यवसाय म्हणून ओळखला जात आहे. त्यामुळे बरेच लोक आज शेती करण्याची टाळाटाळ करत आहेत. आणि एखादा छोटा मोठा व्यवसाय सुरू करत आहेत.

किरण भेकणे
किरण भेकणे
kesar mango

kesar mango

आपला भारत देशाला कृषी चा वारसा लाभला आहे त्यामुळे 90 टक्क्यांपेक्षा जास्त जनता ही शेती  व्यवसाय  करत  आहे. शेती  करताना  शेतकरी बांधवांपुढं अनेक वेगवेगळी  संकटे  येत असतात त्यामध्ये वातावरण झालेला बदल, अवकाळी पाऊस, रोगराई इत्यादी मुळे शेतकरी अडचणीत येत आहे. त्यामुळे शेती घाटयाचा व्यवसाय म्हणून ओळखला जात आहे. त्यामुळे बरेच लोक आज शेती करण्याची टाळाटाळ करत आहेत. आणि एखादा छोटा मोठा व्यवसाय सुरू करत आहेत.

केसरी आंब्याची लागवड :

सध्या शेती व्यवसायात यशस्वी होयच असेल तर आधुनिक तंत्रज्ञान आणि शेतीमध्ये  वेगवेगळे  प्रयोग करून पाहणे खूपच गरजेचे आहे. आधुनिक  तंत्रज्ञान, खतव्यवस्था  यांमुळे  शेतीमधील उत्पन्न वाढवण्यास भर दिला आहे. राज्यात अनेक यशस्वी आणि प्रगतशील शेतकरी आहेत जे शेतीमधून बक्कळ नफा मिळवत आहेत.बीड जिल्ह्यातील सुतार नेट या गावातील एका म्हाताऱ्या जोडप्याने लोकांपुढे आणि नवीन शेतकरी वर्गापुढं आदर्श निर्माण केला आहे. ज्या जमिनीवर गवत सुद्धा उगवत नाही अश्या खडकाळ अश्या जमिनीवर केसरी आंब्याची लागवड केली आहे. पांडुरंग कातखाडे आणि केसरबाई यांनी 2017 साली अर्धा एकर खडकाळ क्षेत्रावर केसर आंब्याची लागवड केली होती आणि यंदा त्या झाडांना हिरव्यागार कैऱ्या लागल्या आहेत.

पांडुरंग कातखाडे आणि केसरबाई यांनी ही केसर आंब्याची रोपे राहुरी कृषी विद्यापीठ येथून 50 रुपये प्रति नग या भावाने आणली होती. लागवडीपासून ते कैऱ्या येईपर्यंत 5 वर्ष त्यांना वाट पहावी लागली. अश्या खडतर प्रयत्नांतून त्यांनी खडकाळ माळावर आंब्याची बाग फुलवली होती.पांडुरंग कातखाडे आणि केसरबाई यांनी 5 वर्ष्याच्या काळात 7 ते 8 फवारण्या केल्या आहेत शिवाय आता प्रति झाडाला 100 ते 170 पर्यँत कैऱ्या आल्या आहेत. गेल्या वर्षी याच बागेमधून त्यांना 20 हजार रुपयांचा नफा मिळाला होता गेल्या वर्षी पेक्षा यंदाच्या वर्षी फळ जास्त असल्यामुळे अधिक फायदा होईल असा अंदाज दाम्पत्याने लावला आहे.

दुसरी पिके घेत घेत हे दाम्पत्य आंब्याची बाग सुद्धा योग्य पद्धतीने सांभाळत आहे. लागवडीसाठी त्यांनी पाण्याचा निचरा होणारी उत्तम जमीन निवडली त्यामुळे केशर आंबे चांगले विकसित झाल्याचे सांगितले जात आहे. शेतीमध्ये यांच्यासोबत यांची 2 मुले सुद्धा काम करतात येणाऱ्या काळात याच केशर च्या बागेतून त्यांना बक्कळ फायदा मिळेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

English Summary: Maximum of old couples! Saffron mango orchard blooms in rocky soil where even grass does not grow Published on: 24 April 2022, 01:48 IST

Like this article?

Hey! I am किरण भेकणे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters