शेतकरी आपल्या शेतात कष्ट करतो, तसेच मोठा खर्च करून तो पीक फुलवतो. असे असताना मात्र त्याला त्याच्यात मालाचा बाजारभाव ठरवण्याचा आधिकार नाही. यामुळे अनेकदा तो आर्थिक संकटात सापडतो. त्याचा माल व्यापारी विकतात, आणि तेच बाजारभाव देखील ठरवतात. असे असताना आता
बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील वटणवाडी येथील शेतकऱ्याने भन्नाट आयडीया केली आहे. यामुळे या शेतकऱ्याची चर्चा सुरु आहे.
उन्हाळ्याला सुरवात होताच टरबूज, खरबूजाच्या मागणीत वाढ झाली असून या शेतकऱ्याने शेतासमोरच फळविक्री केंद्र सुरु केले आहे. यामुळे शेतकऱ्यांचा यामध्ये फायदा होत आहे. यामुळे त्यांना चार पैसे मिळत आहेत. ना वाहतूकीचा खर्च ना कवडीमोल दर. ग्राहकांना परवडेल आणि स्वत:चा खर्च निघेल या उद्देशाने सुरु केलेल्या फळविक्री केंद्राला चांगला प्रतिसादही मिळत आहे.
अनेकदा व्यापारी फसवणूक करतात अशा बातम्या देखील आपण बघत असतो. यामुळे आता शेतकऱ्यांनीच जागरूक असणे गरजेचे आहे. येथील शेतकरी हनुमंत जाधव यांच्या या अनोख्या उपक्रमामुळे त्यांच्याही उत्पन्नात वाढ झाली शिवाय ग्राहकांनाही अस्सल गावरान फळे चाखायला मिळत आहेत. यामुळे ग्राहक देखील त्यांच्याकडे आवर्जून येत आहेत.
तसेच जाधव हे इतर शेतकऱ्यांकडून फळे घेऊनही विक्री करीत आहेत. बीड तसा दुष्काळी जिल्हा पण उत्पादन वाढीसाठी केलेल्या या प्रयोगाचे कौतुक होत आहे. सध्या उन्हाळा वाढत असल्याने कलिंगड आणि खरबूजाच्या मागणीत वाढ होत आहे. हनुमंत जाधव यांनी टरबूज आणि खरबूजाची सेंद्रीय पध्दतीने लागवड केली होती. रासायनिक खताचा वापर त्यांनी केला नाही.
या केंद्रावरील फळांना अधिकची मागणी आहे. शिवाय थेट शेतकऱ्यांकडून फळे मिळत असल्याने व्यापाऱ्यांपेक्षा स्वस्त असणार ही ग्राहकांची भावना झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्याने केलेल्या या प्रयोगाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. यामुळे शेतकरी आणि ग्राहक दोघेही समाधानी आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी आपला माल स्वतःच विकला तर त्यांना चांगला फायदा होणार आहे.
महत्वाच्या बातम्या;
मोठी बातमी! चीनमध्ये कोरोना संसर्गामुळे हाहाकार, पुन्हा लॉकडाऊन लागू
शेतकऱ्यांनो पंजाब डख यांनी केलेला पावसाविषयी अंदाज वाचा, शेतीच्या कामाबाबत आहे फायद्याचे..
ऊस पिकावर ड्रोनने खते आणि कीटकनाशकांची फवारणी केल्यास आहे फायदाच फायदा, वाचा संपूर्ण माहिती..
Share your comments