1. बातम्या

बीड जिल्ह्याची एक वेगळीच ओळख, दिवसाकाठी रेशीम कोष उद्योगाच्या माध्यमातून लाखोंचे उत्पन्न

बीड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील आठ दिवसांपासून रेशीम कोष खरेदीला सुरुवात झालेली आहे. जिल्हा तसेच जिल्ह्याबाहेरील व्यापारी वर्ग रेशीम खरेदी साठी बाजार समितीमध्ये दाखल झाले आहेत.दिवसाकाठी सुमारे ६-७ लाख रुपयांची उलाढाल होत आहे. बाजार समितीत आता खरेदी ला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे तसेच शेतकऱ्यांना जिल्ह्याच्या बाहेर विक्री करण्यास जाण्यासाठी खर्च टळला आहे.

किरण भेकणे
किरण भेकणे
silk cocoon

silk cocoon

बीड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील आठ दिवसांपासून रेशीम कोष खरेदीला सुरुवात झालेली आहे. जिल्हा तसेच जिल्ह्याबाहेरील व्यापारी वर्ग रेशीम(silk) खरेदी साठी बाजार समितीमध्ये दाखल झाले आहेत.दिवसाकाठी सुमारे ६-७ लाख रुपयांची उलाढाल होत आहे. बाजार समितीत आता खरेदी ला चांगला प्रतिसाद  मिळालेला  आहे  तसेच शेतकऱ्यांना जिल्ह्याच्या बाहेर विक्री करण्यास जाण्यासाठी खर्च टळला आहे.

बीड जिल्हा म्हणजे दुष्काळी भाग मात्र काळाच्या ओघात तिथे शेतीबदल करण्यात आला आहे. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात रेशीम उद्योगाचे जाळे मोठे आहे जे की यापूर्वी रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना विक्रीसाठी जालना कडे जावे लागत होते व आता जिल्ह्यात बाजारपेठ उपलब्ध झालेली आहे तसेच योग्य दर मिळत आहे.

आवश्यक कागदपत्रे:-

रेशीम उत्पादक शेतकरी संख्या कमी असल्यामुळे यामध्ये कोणतीही अनियमितता येणार नाही त्यामुळे सातबारा, ८ अ, आधारकार्ड घेऊन येण्याची आवश्यकता लागणार नाही तर फक्त पासबुक हे ऑनलाइन पेमेंटसाठी लागेल अशी माहिती सचिव अशोक वाघिरे यांनी दिली आहे.

रेशीम उद्योगात वाढ:-

अतिवृष्टी आणि दुष्काळ या दोन्ही संकटात रेशीम कोष उत्पादक शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे उत्पादन मिळाले आहे त्यामुळे मराठवाडा मध्ये रेशीम उद्योगाचे  जाळे  वाढतच  निघाले आहे. बीड जिल्ह्यातील ३५९३ शेतकरी सुमारे ३७८६ एकरावर तुती लागवड करत आहेत. मागील वर्षी जिल्ह्यामध्ये ६५० टन रेशीम कोष उत्पादन झाले तर चालू वर्षी ७०० टन रेशीम कोष चे उत्पादन अपेक्षित आहे. पश्चिम महाराष्ट्र मध्ये जेवढे कोष उत्पादन होते तेवढे एकटे उत्पादन बीड जिल्ह्यात होते. उत्तम प्रकारचे कोष उत्पादन बीड जिल्ह्यात होते.

दरही चांगला:-

बीड जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोष खरेदीला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहे. दिवसाकाठी जिल्ह्यातील १२ ते १५ शेतकरी कोष घेऊन बाजारात येतात. अगदी २ किलोपासून ते २ क्विंटल पर्यंत आवक होते.

English Summary: A distinct identity of Beed district, earning millions through the day silk cocoon industry Published on: 14 November 2021, 09:29 IST

Like this article?

Hey! I am किरण भेकणे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters