शेतकऱ्यांना अनेक गोष्टीचा सामना करावा लागत आहे. पेट्रोल आणि डिझेल (Petrol diesel) दरात खूप वाढ झाली आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. यावर उपाय म्हणून शेतकरी आता इलेक्ट्रिक वाहनांकडे (Electric vehicles) वळले आहेत.
बनवला बॅटरीवर चालणारा ट्रॅक्टर Battery powered tractor
शेतकऱ्याचा नादच खुळा..! शेतकऱ्याने थेट बॅटरीवर चालणारा ट्रॅक्टर बनवला आहे. गुजरातमधील (Gujrat) एका तरुण शेतकऱ्याने एक भन्नाट कामगिरी केली आहे. गुजरातमधील (Gujrat) जामनगर जिल्ह्यातील कलावद तालुक्यातील पिपर गावातील एका 34 वर्षीय शेतकऱ्याने (Farming) शेती कामांसाठी एका नवीन ट्रॅक्टर ची निर्मिती केली आहे.
महेश भाई नामक शेतकऱ्याने बॅटरीवर चालणारे ट्रॅक्टर तयार केला आहे. या बॅटरी चलित ट्रॅक्टरला महेशने ‘व्योम’ असं नामकरण केले आहे.या नवयुवक शेतकऱ्याने बॅटरीवर चालणारा ‘इलेक्ट्रिक ट्रॅक्टर’ (Electric Tractor) बनवला आहे. या युवा शेतकऱ्याने उत्तम कामगिरी केली आहे. हा तरुण शेतकरी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
"या ट्रॅक्टरची वैशिष्ट्ये"
१. हा इलेक्ट्रिक ट्रॅक्टरसाठी 22 एचपीची पॉवरचा आहे.
२. या ट्रॅक्टरमध्ये 72 वॅट लिथियम बॅटरी लावली आहे. महेश यांच्या मते, ही लिथीयम बॅटरी उत्तम दर्जाची बॅटरी आहे, विशेष म्हणजे या बॅटरीला बदलण्याची गरज पडणार नाही.
३. हा ट्रॅक्टर पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 4 तासांचा कालावधी लागतो.
४. एकदा फुल चार्ज केल्यानंतर महेश ने तयार केलेला हा ट्रॅक्टर तब्बल 10 तास चालू शकतो.
५. निश्चितच या बॅटरी चलित ट्रॅक्टरची रेंज खूपच अधिक आणि शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे.
६. या ट्रॅक्टरमुळे प्रदूषण अजिबातचं होतं नाही म्हणजेच हा ट्रॅक्टर इको फ्रेंडली आहे.
७. हायटेक फिचर्स देखील वापरले आहेत जसे की, ट्रॅक्टरचा वेग फोनवरूनही नियंत्रित करता येतो.
Indian Railways : कामाची बातमी : रेल्वे मधील सीट आणि टीसीचे नियम जाऊन घ्या...
शेतीमध्ये वाढत असलेला उत्पादन खर्च लक्षात घेता या बॅटरी चलित ट्रॅक्टरची निर्मिती केली आहे. महेश यांनी यावर प्रकाशझोत टाकून प्रदूषणविरहित वाहन निर्माण करून निश्चितच एक कौतुकास्पद कार्य केले आहे. महेश यांनी तयार केलेला हा बॅटरी चलित ट्रॅक्टर शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे. यामुळे इंधन बचत शिवाय प्रदूषण टाळता येतं असल्याने या ट्रॅक्टरला अधिक पसंत केलं जातं आहे.
7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट ! DA वाढू शकतो, जाणून घ्या किती वाढणार...
Share your comments