1. यशोगाथा

लॉकडाऊन ठरले वरदान; उभारला आनंद नावाचा स्वतःचा ब्रँड

पुणे : लॉकडाऊनने अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, हातातील काम गेल्यामुळे लोकांचे जगणे अवघड झाले आहे. सर्वत्र ही परिस्थिती झाली असताना वाई येथील शेतकरी राहुल निंबाळकर यांना मात्र लॉकडाऊन वरदान ठरले आहे.

KJ Staff
KJ Staff


पुणे  : लॉकडाऊनने अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, हातातील काम गेल्यामुळे लोकांचे जगणे अवघड झाले आहे. सर्वत्र ही परिस्थिती झाली असताना वाई येथील शेतकरी राहुल निंबाळकर यांना मात्र लॉकडाऊन वरदान ठरले आहे. व्यापाऱ्यांच्या मनमानीला कंटाळलेल्या राहुल यांनी स्वतः पिकवलेल्या हळदीवर प्रक्रिया करून विक्री सुरु केली असून त्यात त्यांना दोन महिन्यात चांगले यश मिळाले आहे.

राहुल निंबाळकर हे वाई तालुक्यातील बेलमाची गावातील शेतकरी असून कामानिमित्त पुण्यात राहतात. यावर्षी मार्च महिन्यात कोरोनामुळे सरकारला लोकडाऊन जाहीर करावे लागले. पुण्यातील अनेकांनी गावची वाट धरली. राहील याचे वडील हळदीची शेती करतात. गेल्या सात वर्षांपासून ते हळदीचे उत्पादन घेतात. राहुल निंबाळकर हे वडिलांना नियमित शेतीच्या कामात मदत करतात.  स्वतःच्या हळदीचा ब्रँड करून तो विकायची ही कल्पना कशी सुचली यावर बोलताना ते म्हणाले कि, “ आम्ही मागच्या काही वर्षांपासून हळदीचे पीक घेत आहोत. मी वडिलांना मदत करायचो. पण मी कधी पैशात लक्ष घातले नाही. यावर्षी मात्र लोकडाऊनमध्ये मात्र घरी असताना व्यापारी वर्गाकडून शेतकऱ्यांच्या पिळवणुकीची कल्पना आली. ते पैसे द्यायला उशीर करतात. आपण केलेल्या कष्टापेक्षा अत्यंत कमी परतावा आपल्याला मिळतो.”

“ त्यामुळे मी मनावर घेतले आणि स्वतःच प्रक्रिया करून आपली हळद आपण विकायची हे ठरवले. मी धोका पत्करला होता. कारण शेतकऱ्यांनी पिके पिकवायची आणि व्यापाऱयांनी त्यावर पैसे कमवायचे हेच आपण आतापर्यत पाहत आलो आहे. तसेच आजूबाजूचे लोक काय बोलतील, आपण यशस्वी होऊ की नाही यामुळे आपण व्यवसायात उतरत नाही. मी मात्र घरच्यांना विश्वासात घेतले आणि थोडी रिस्क घेण्याची तयारी ठेवली. त्यामुळे आज आमचा ‘आनंद हळद पावडर’ नावाचा ब्रँड उभा राहिला. आम्हाला या सगळ्या काळात सोशल मीडियाचीही खूप मदत झाली. आम्ही फेसबुक, व्हाट्स अँप वरून जवळच्या लोकांना, मित्रांना सांगितले, त्यांनी त्याच्या पद्धतीने प्रचार केला. या सगळ्याचा परिपाक म्हणजे आम्ही सुमारे ७५० किलो हळद फक्त गेल्या एका महिन्यात विकली.”


राहुल निंबाळकर हे महाराष्ट्राच्या सर्व भागात हळद पाठवतात. हळदीची किंमत फक्त २४० प्रतीकिलो असून कुरिअरचा खर्च वेगळा आहे. घरगूती पद्धतीची सेलम जातीच्या हळदीला पुणे शहरात अल्पवधीत खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ही हळद एक किलोच्या बरणीमध्ये उपलब्ध आहे.
राहुल यांच्यासारखा प्रयोग अनेक शेतकरी करू शकतात. तसेच सोशल मीडियामुळे मालाच्या विक्रीला चालना मिळाली आहे. तसेच खूप कमी पैसे खर्च करून आपल्याला जाहिरात देखील करता येऊ शकते.

तुम्हाला जर राहुल निंबाळकर यांच्याकडून अधिक माहिती हवी असेल आणि हळदीची ऑर्डर दयायची असेल तर त्यांना खालील नंबरवर फोन करा राहुल निंबाळकर, सध्याचा पत्ता पुणे. ९८२२४७२६९९, गौरी निबांळकर ७६२००२७०५४, संपर्कासाठी anandmasalepune@gmail.com या मेल आयडी आपला ऑर्डर देऊ शकता. व्हॉट्सअपवर ऑर्डर देण्यासाठी https://api.whatsapp.com/send?phone=+919822472699 या लिंकवर क्लिक करा.

लेखक -

शेखर पायगुडे 9921215008

English Summary: Lockdown became a boon, raised its own brand called Anand Published on: 26 July 2020, 09:54 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters