1. यशोगाथा

सोलापूरच्या शेतकऱ्याने विकसित केल किंग बेरी जातीच द्राक्षे आंतरराष्ट्रीय बाजारात आहे 180 रुपये किलो भाव

शेतीमध्ये होणारे नवनवीन बदल, उत्पादन पद्धती तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यामुळे शेतीमध्ये अनेक आधुनिक बदल घडत आहेत.रब्बी आणि खरीप हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकांपेक्षा शेतकरी वर्गाचा फळबागेवर जास्त कल वाढत चालला आहे. कारण फलबागांमधून वर्षोनुवर्षे उच्च उत्पन्न मिळत असते. यामुळे बरेच लोक आपल्या शेतामध्ये डाळिंब, पपई, अंजीर, केळी इत्यादी फळबागांची लागवड करत आहेत.

किरण भेकणे
किरण भेकणे
grapes

grapes

शेतकरी वर्गाचा अलीकडच्या काळात नगदी आणि भुसार पिकाचे उत्पन्न कमी होत चालले आहे. शेतकरी वर्गाचा जास्त कल हा फलबागांकडे वळत चालला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी वर्ग कमी वेळात जास्त उत्पन्न मिळवत आहेत.फळबागांमध्ये आपल्याकडे सर्वसाधारण पणे आंबा, चिक्कू, पेरू, डाळिंब, द्राक्षे या फळांच्या  झाडाची  लागवड  केली   जाते. आपल्याकडील द्राक्ष बागायतदार शेतकरी पूर्वीपासून विटिस व्हिनिफेरा या सामान्य वाणाच्या द्राक्ष वेलीची लागवड  करत आहेत. परंतु सध्या  महाराष्ट्र राज्यातील शेतकरी  अनेक  वेगवेगळ्या जातीचे वाण विकसित करत आहेत.

द्राक्षाच्या 5 जाती विकसित केल्या:

सोलापूर जिल्हा हा दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यामुळं कमी पाण्यावर येथ शेती केली जाते. सोलापूर जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी दत्तात्रय काळे यांनी गेल्या वर्ष्यात द्राक्षाच्या 5 जाती विकसित केल्या आहेत. या वानाला फक्त महाराष्ट्र राज्यातून नाही तर कर्नाटक, आंध्रप्रदेश,तामिळनाडू आणि तेलंगणा या राज्यातून  पसंती  मिळाली  आहे.काळे यांनी  विकसित केलेल्या किंग बेरी या द्राक्षाच्या वानाला जास्त पसंती मिळाली आहे. या किंग बेरी द्राक्षाचे वैशिष्ट्य म्हणजे या वाणाची द्राक्ष ही 45 ते 50 मिमी लांब आणि 24 ते 25 मिमी रुंद आहे.

तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात या वाणाच्या द्राक्षे ला मोठी मागणी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या द्राक्षे ला 165 ते 180 रुपये प्रति  किलो  पर्यंत  एवढा  भाव  मिळत आहे. तसेच  स्थानिक बाजारात या द्राक्षेला 80 रुपये प्रति किलो एवढा भाव मिळत आहे. तसेच या वाणापासून बनवलेल्या बेदाण्याची किंमत ही 600 रुपये प्रति किलो एवढी आहे.

किंग बेरी या वाणाची द्राक्ष काळ्या आणि जांभळ्या रंगाची असते. आकार सुद्धा लांबलचक आहे. तसेच या द्राक्षे पासून प्रीमियम लांबलचक मनुका तयार केला जातो. सोलापूर जिल्ह्यातील दत्तात्रय काळे यांनी 25 एकरामध्ये 6 वेगवेगळ्या वाणाच्या द्राक्षेची जाती विकसित केल्या आहेत.

English Summary: King berry variety of grapes developed by Solapur farmers is priced at Rs. 180 per kg in the international market Published on: 23 November 2021, 02:31 IST

Like this article?

Hey! I am किरण भेकणे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters