कोणत्याही व्यवसायात जिद्द आणि कठोर परिश्रम केल तर निश्चितच यशाला गवसणी घालता येणे शक्य असते. यश मिळवण्यासाठी अपार कष्ट घ्यावे लागतात याशिवाय याला योग्य नियोजनाची देखील सांगड घालावी लागते. मग ते शेतीचे का क्षेत्र असेना.
जयपूर जिल्ह्यातील अजितसिंग ढिल्लन यांनी देखील कष्टाला योग्य नियोजनाची सांगड घालून शेळीपालन या शेतीपूरक व्यवसायातून नेत्रदीपक असे यश संपादन केले आहे. यांच्या संघर्षाची आणि यशाची कहाणी प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरणारी आहे. या रिटायर्ड अधिकाऱ्याने निवृत्तीनंतर शेळीपालन व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी त्यांनी गोट फार्म उभारले. आज 80 वर्षीय ढिल्लन यांची उलाढाल सुमारे 1 कोटी आहे. जयपूरचे रहिवासी अजित सिंह धिल्लन 20 वर्षांपूर्वी भारत सरकारच्या कृषी विभागातून निवृत्त झाले होते.
महत्वाची बातमी:
Goat Farming : बकरी पालन करतात का? मग या अँप्लिकेशनचा वापर करा आणि व्हा यशस्वी
निवृत्तीनंतर शेळीपालन करण्याचा विचार केला अन यासाठी आदर्श अशा गोट फार्मची निर्मिती केली. सुमारे 10 वर्षांपूर्वी म्हणजे त्यांच्या वयाच्या 70 व्या वर्षी जयपूरच्या चिथवाडीजवळील चक डगवारा येथे सिरोही जातीच्या 60 शेळ्यांसह शेळीपालन सुरू केले. हळूहळू त्यांची संख्या वाढत गेली. कोरोनाच्या काळात सुमारे 1 हजार शेळ्यांची विक्री झाली. सध्या सोजत जातीच्या 300 शेळ्या आणि बोकडाचे ते संगोपन करत आहेत.
शेळीपालन फायदेशीर व्यवसाय मात्र, देखरेख आवश्यक:
शेळीपालन हा व्यवसाय फायदेशीर व्यवसाय ठरतो आणि शेतकऱ्यांना यापासून चांगला फायदा देखील मिळतं आहे परंतु हा व्यवसाय सुरु करण्यासाठी संपूर्ण समर्पण आणि व्यवस्थापनाची गरज असते यात तिळमात्रही शंका नाही.
शेळीच्या फीड मॅनेजमेंटपासून प्रत्येक गोष्टीवर 24 तास लक्ष देणे अपेक्षित असते. अजितसिंग ढिल्लन सांगतात की, शेळीपालनावर 24 तास लक्ष ठेवावे लागते. त्यांनी देखील या व्यवसायासाठी आपले 24 तास दिले आहेत. शेळीला चारा देण्याचे वेळापत्रक तयार करून त्यानुसार अनुकरण करणे देखील अतिमहत्त्वाचे असते. आजारी शेळी ओळखून त्या शेळीला वेळीच पशुवैद्याकडे घेऊन जाणे अतिमहत्वाचे आहे निश्चितच हे काम चोवीस तास करावे लागते. चोवीस तास या व्यवसायात लक्ष घातल्यास निश्चितच हा व्यवसाय नफ्याचा सौदा बनू शकतो.
शेड बांधण्यासाठी 15 लाख खर्च
रिटायर ऑफिसर यांनी सुरू केलेल्या सरदार गोट फार्ममध्ये सध्या 300 शेळ्या आहेत, लवकरच ही संख्या आणखी वाढणार आहे. अजित सिंह म्हणाले की, शेड बांधण्यासाठी त्यांना सुमारे 15 लाख रुपये खर्च आला आहे.
कोरोनापूर्वी त्यांच्या गोट फार्म मधील आकडा 1000 वर पोहोचला होता, मात्र कोरोनाच्या काळात मागणी कमी झाल्यामुळे त्यांनी शेळ्यांची मोठ्या प्रमाणात विक्री करून टाकली. शेळीपालन हा भारत सरकारच्या राष्ट्रीय लाइव्ह स्टॉक मिशनमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. यामुळे हा व्यवसाय सुरू करण्यासाठी केंद्र सरकारकडून पशुपालक शेतकऱ्यांना मदत देखील दिली जाते.
Share your comments