1. यशोगाथा

Cash Crop: सुरवातीला दहा हजार रुपये खर्च करून करा 'या' पिकाची लागवड आणि मिळवा लाखोंचे उत्पन्न; बघा याचे उत्तम उदाहरण

शेतकरी मित्रांनो जर आपणास शेती परवडत नाही असा गैरसमज असेल तर आम्ही आपल्यासाठी एक विशिष्ट पिकाच्या लागवडीविषयी काही महत्त्वपूर्ण बाबी घेऊन आलो आहोत. मित्रांनो पारंपारिक पिकांची आपण जर लागवड करीत असाल तर आपणास उत्पादन खर्च काढणे देखील शक्य होणार नाही. आपणास शेती क्षेत्रातून लाखो रुपयांचे उत्पन्न जर प्राप्त करायचे असेल, तर आपणास कॅश क्रॉप अर्थात नगदी पिकांची लागवड करावी लागणार आहे. आज आम्ही आपणास काळीमिरी लागवड शेतकऱ्यांसाठी कशी लाभप्रद सिद्ध होत आहे याविषयी सविस्तर सांगणार आहोत. शेतकरी मित्रांनो मेघालय मध्ये राहणाऱ्या एका अवलिया शेतकऱ्याने काळी मिरी लागवड करून लाखो रुपयांचा नफा कमविला आहे.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
black pepper

या अवलिया शेतकऱ्यांने मात्र पाच एकर क्षेत्रात काळी मिरी ची यशस्वी लागवड करून लाखो रुपयांचे उत्पन्न प्राप्त केले, या शेतकऱ्याच्या या नेत्रदीपक यशामुळे  भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार देखील त्यांना प्रदान करण्यात आला आहे. मेघालय मध्ये राहणारे नानाडो मारक एक प्रगतिशील शेतकरी आहेत, त्यांनी सर्वप्रथम कारी मुंडा या जातीची काळी मिरी लागवड केली होती. विशेष म्हणजे मेघालय राज्याचे सुपुत्र नानाडो काळीमिरी लागवडी संपूर्ण जैविक खतांचा वापर करत असतात, त्यामुळे त्यांना अत्यल्प उत्पादन खर्च लागतो शिवाय यांपासून प्राप्त होणारे उत्पादन विषमुक्त असून यामुळे मानवी आरोग्याला कुठलाच धोका नसतो. नानाडॉ यांनी सुरुवातीला फक्त दहा हजार रुपये खर्च करून दहा हजार काळीमिरी रोपांची लागवड केली होती. परंतु काळीमिरी लागवडीतुन त्यांना चांगले घवघवीत यश प्राप्त होत असल्यामुळे त्यांनी हळूहळू काळी मिरी लागवडीचे क्षेत्र वाढविले. त्यांची काळी मिरी जैविक पद्धतीने पिकवलेली असते त्यामुळे या काळ्या मिरीला जगभरात मोठी मागणी आहे. त्यांचे घर पश्चिम गारो हिल्सच्या टेकड्यांमध्ये आहे.

जर आपण त्यांच्या वावरात प्रवेश केला तर आपणांस काळी मिरीसारखा मसाल्यांचा सुगंध बघायला मिळेल. गारो हिल्स हा संपूर्ण डोंगराळ आणि जंगलाचा परिसर आहे. मारक यांनी झाडे न तोडता आणि पर्यावरणाची कोणतीही हानी न करता काळीमिरीची लागवड वाढवली. या कामात त्यांना राज्याच्या कृषी व फलोत्पादन विभागाचे पूर्ण सहकार्य लाभले. मारक यांनी त्यांच्या जिल्ह्यातील शेतकर्‍यांना काळी मिरी लागवडीसाठी मोठी सक्रिय मदत केली आहे. मारक यांनी मेघालयातील काळीमिरीच्या उत्पादणात मोठा वाटा उचलला आहे, तसेच त्यांनी आपल्या नेत्रदीपक यशामुळे इतर शेतकऱ्यांसाठी एक उत्तम उदाहरण मांडले आहे.

वर्ष 2019 मध्ये त्यांनी काळीमिरी लागवडीतून 19 लाख रुपयांचे उत्पन्न घेतले आहे, मारक यांची कमाई दिवसेंदिवस वाढत आहे. भारत सरकारने मारक यांनी शेतीत केलेले परिश्रम लक्षात घेत त्यांचे कार्य मोठे कौतुकास्पद असल्याचे उद्गार काढले आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत भारत सरकारने 72 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मारक यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे. शेतकरी मित्रांनो आपण देखील मारक यांसारखे काळी मिरी लागवड करून चांगला मोठा नफा कमवू शकतात. काळी मिरी लागवडीसाठी मारक यांनी जैविक खतांचा वापर केला त्यामुळे त्यांना उत्पादन खर्च खूपच कमी आला, आपण देखील जैविक पद्धतीने काळीमिरी लागवड करून चांगला मोठा नफा अर्जित करू शकतात.

English Summary: invest 10000 and start cultivate this crop and earn good profit Published on: 26 February 2022, 11:51 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters