1. यशोगाथा

59 कांडी असलेला ऊस आहे 'या' शेतकऱ्याच्या शेतात,नेमके कसे केले नियोजन? वाचा 'या'शेतकऱ्यांचे अनुभव

आपण बरेच यशस्वी शेतकऱ्यांच्या कहाण्या वाचतो किंवा ऐकतो, पण आज कृषी जागरण तुमच्यासाठी एका शेतकऱ्याची कहाणी घेऊन आले आहे. ज्याचा शेतातला ऊस हा भारतातील सर्वात मोठ्या ऊसापैकी एक असून त्यांची शेती पाहण्यासाठी आणि जाणून घेण्यासाठी लोक दूरदुरून येतात. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते त्यांच्या शेतात केवळ ऊस लागवडच नाही करत तर विविध प्रकारच्या भाजीपाल्याचे उत्पादन घेतात. राकेश रायका असे या शेतकऱ्याचे नाव असून ते गुजरात राज्यातील नवसारी येथील रहिवासी आहेत.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
symbolic image

symbolic image

आपण बरेच यशस्वी शेतकऱ्यांच्या कहाण्या वाचतो किंवा ऐकतो, पण आज  कृषी जागरण तुमच्यासाठी एका शेतकऱ्याची कहाणी घेऊन आले आहे. ज्याचा शेतातला ऊस हा भारतातील सर्वात मोठ्या ऊसापैकी  एक असून त्यांची शेती पाहण्यासाठी आणि जाणून घेण्यासाठी लोक दूरदुरून येतात. त्यांचे  वैशिष्ट्य म्हणजे ते त्यांच्या शेतात केवळ ऊस लागवडच नाही करत तर विविध प्रकारच्या भाजीपाल्याचे उत्पादन घेतात. राकेश रायका असे या शेतकऱ्याचे नाव असून ते गुजरात राज्यातील नवसारी येथील रहिवासी आहेत.

 वाचा राकेश रायका यांचे एकूण व्यवस्थापन आणि शेती पद्धत

 जेव्हा कृषी जागरणच्या टीमने शेतकरी राकेश रायका यांना या ऊसाविषयी माहिती विचारली तेव्हा त्याने सांगितले की, गेल्या अठरा वर्षांपासून शेती करत असून सुमारे दीडशे एकर त्यांची शेती आहे. त्यांच्या शेतामध्ये सध्या एकोणसाठ कांडी असलेला ऊस उभा असून इतर शेतकऱ्यांच्या उसापेक्षा त्यांनी व्यवस्थापन केलेला ऊस खूप पद्धतीने वेगळा आहे.

नक्की वाचा:Grain Storage: धान्याची साठवणूक करताना 'या' गोष्टींची काळजी घ्या; अन्यथा होईल मोठे नुकसान

 ऊस लागवड पद्धत

 सगळ्यात अगोदर त्यांचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे उसाचे बेणे ते स्वतः तयार करतात व ऊस लागवड करतात. उसामध्ये चार ते साडेचार फूट अंतर ठेवतो आणि लागवड करण्यासाठी दोन फुटाचे अंतर ठेवतात. त्यामुळे पिकाची वाढ चांगली होते

त्यांचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ते सेंद्रिय शेतीकडे जास्त लक्ष देतात आणि फारच कमी रसायनांचा वापर शेतीत करतात. उसाला खत व्यवस्थापन करताना ते खड्डा खणून खताचा पहिला डोस देतात. त्यांनी सांगितले की आम्ही आमचे पिक ईएम उत्पादनांमध्ये आणि इतर अनेक उत्पादनांमध्ये घालतो, जे ऊस लागवडीसाठी फायदेशीर असून याच्या वापराने जमिनीत असलेल्या धोकादायक जिवाणू नष्ट होतात.

पिकांचे चांगले उत्पादन घेण्यासाठी शेतजमिनीत योग्य प्रमाणात जीवाणू असणे आवश्यक आहे.तसेच त्यांनी सांगितले की येणाऱ्या काळात पिकांसाठी वापरण्यात येणाऱ्या रासायनिक खतांचे प्रमाण ते कमी करणार असून त्या तुलनेत शेतात सेंद्रिय खत जास्त प्रमाणात देण्यास सुरुवात ते करणार आहेत

जेणेकरून पिकांची वाढ चांगली होईल. त्यांनी सांगितले की उसाचे पीक घेण्यासाठी केवळ सेंद्रिय पद्धतच नाही तर शेतात न्यूटन देणे अत्यंत आवश्यक आहे.

याचा वापर केल्याने शेतातील मातीला कोणतीही हानी होणार नाही आणि जिवाणूंचे प्रमाण जमिनीत योग्य राहील. त्यामुळे उपयुक्त जिवाणूंचे प्रमाण शेतीत योग्य राहील व सेंद्रिय कार्बनचे प्रमाण देखील शेतीत वाढत राहील.

नक्की वाचा:अशी करा घोसाळी पडवळ लागवड आणि कमवा बक्कळ पैसा

त्यांनी सांगितलेले ऑरगॅनिकचे फायदे

 त्यांनी सांगितले की या सर्व गोष्टींचा वापर करून पूर्वी एक एकरात 35 टन ऊस मिळत होता. परंतु आत्ता एका एकरातून 90 टन किंवा त्याहून अधिक ऊस मिळत असल्याचे देखील राकेश यांनी सांगितले.

 राकेश रायका यांच्याबद्दल माहिती

 राकेश रायका सांगतात की त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह ते शेतात काम करतात. पूर्वी ते पशुपालन करत होते परंतु काही कारणामुळे त्यांचे पशुपालन करणे बंद केले आहे. राकेश रायका हे एक यशस्वी शेतकरी आहेतच परंतु हे चांगले व्यापारी देखील आहेत. इतर शेतकऱ्यांना मदत व्हावी यासाठी ते ऍग्रो देखील चालवतात.

 त्यांचा शेतकऱ्यांना संदेश

देशातील सर्व शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वाटचाल करावी कारण हे शेतकऱ्यांचे भविष्य आहे. तुम्ही शेतातील रासायनिक शेती हळूहळू कमी करण्यास सुरुवात करावी जेणेकरून तुमच्या शेतीतून बाहेर पडणाऱ्या शेतमालापासून कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागणार नाही.

शेतकरी बांधवांना जर शेतीतून अधिक नफा मिळवायचा असेल तर त्यांना आता सेंद्रिय  शेतीचा अवलंब करणे गरजेचे आहे तर ते दोन पैसे कमवू शकतात असे त्यांनी म्हटले.

नक्की वाचा:Greenary Fertilizer:ऊस लागवडीपूर्वी हिरवळीचे खत म्हणून तागाची लागवड ठरेल फायदेशीर,परंतु का?वाचा सविस्तर….

English Summary: in navsari gujrat state farmer use organic method for cane crop production Published on: 10 August 2022, 10:28 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters