1. यशोगाथा

केला सेंद्रिय खतांचा वापर घेतले एकरी 80 ते 85 टन उसाचे उत्पादन

शेती म्हटले म्हणजे प्रचंड कष्ट, अफाट मेहनत आणि अस्मानी आणि सुलतानी संकटात सारखे येणारे एकामागून एक नैसर्गिक संकटे या सगळ्या गोष्टींमध्ये धीरोदात्त पणे उभे राहून केला जाणारा व्यवसाय म्हणजे शेती असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
courtesy-netafim

courtesy-netafim

 शेती म्हटले म्हणजे प्रचंड कष्ट, अफाट मेहनत आणि अस्मानी आणि सुलतानी संकटात सारखे येणारे एकामागून एक नैसर्गिक संकटे या सगळ्या गोष्टींमध्ये धीरोदात्त पणे उभे राहून केला जाणारा व्यवसाय म्हणजे शेती असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

इतके अनिश्चितता असून देखील  शेतकरी शेती करणे सोडत नाहीत. कारण शेती म्हटले म्हणजे एक जगण्याचा अविभाज्य भाग आहे. शेती परवडली,तोटा झाला तरी मोठे हिमतीने शेतकरी शेती करतातच. आता इतर क्षेत्रांतप्रमाणे शेतीमध्ये देखील तंत्रज्ञानाचे वारे वाहू लागले आहेत. शेतीमध्ये  विविध पिकांच्या संदर्भात वेगळे तंत्रज्ञान वापरून शेतकरीजास्तीचे उत्पादन घेत आहेत. शासनाच्या काही योजना देखील याला  सहाय्यभूत ठरत आहेत.आता बरेच तरुण शेतकरी शेतातील परिश्रमाला योग्य तंत्रज्ञानाची आणि नियोजनाची जोड देऊन शेतीमध्ये क्रांती घडवून आणत आहेत. अशाच एका शेतकऱ्याची कहाणी आपण या लेखात पाहणार आहोत.

 नंदुरबार  जिल्ह्यातील सारंगखेडा येथील पंकज रावल यांनी कुठल्याही प्रकारच्या रासायनिक खतांचा वापर न करता नुसते सेंद्रिय खते वापरून आणि योग्य नियोजन ठेवून उसाचे एकरी 80 ते 85 टन उत्पन्न घेतले आहे. पंकज रावल यांनी दाखवून दिले की शेती पद्धतीमध्ये  योग्य तो बदल आणि तंत्रज्ञानाची जोड दिली तर शेतीही नफ्याचा व्यवसाय होऊ शकतो. पंकज रावल यांनी त्यांच्या दहा एकर क्षेत्रात सेंद्रिय पद्धतीने उसाची शेती केली. ऊस लागवड करणे अगोदर त्यांनी शेतामध्ये मोठ्या प्रमाणात शेणखत आणि परिसरात मिळत असलेला पालापाचोळा यापासून तयार केलेले गांडूळ खत शेतात वापरले. रासायनिक खतांचा अत्यंत अत्यल्प वापर केला. तसेच व्यवस्थितपणे सिंचनाचे नियोजन साधून त्यांनी ही किमया साध्य केली.

जर उसाचा उताऱ्याचा सरासरी एकराचा विचार केला तर उत्तर महाराष्ट्रात 40 ते 45 टन इतका आहे. परंतु पंकज रावल यांनी एक 80 ते 85 टन उत्पन्न घेतले आहे. त्यांनीच त्यांच्या परिश्रमाला योग्य नियोजनाची आणि व्यवस्थित तंत्रज्ञानाची सांगड घालून हे शक्य करून दाखवले. त्यांनी त्यांच्या दहा एकर उसाच्या लागवडीपासून तोडणीपर्यंत एकूण चार लाख रुपये खर्च केला आहे. आणि त्यामधून जवळजवळ आठ लाख रुपयांचे उत्पादन घेतले आहे. याबाबतीत त्यांनी रासायनिक खतांवर जास्त खर्च न केल्यामुळे आणि योग्य नियोजन केल्याने त्यांच्या खर्चात बचत होऊन नफ्यात वाढ झाली आहे.

English Summary: in nandurbaar district sarangkheda farner use organic fertilizer for cane crop take 85 tonn cane production Published on: 30 December 2021, 06:47 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters