मागील वर्ष हे सर्वांसाठी मोठं त्रासदायक ठरलं. कोरोनामुळे देशात पूर्ण लोक चिंताग्रस्त होते. बऱ्याच तरुणांच्या नोकऱ्या हातातून गेल्या होत्या. अनेकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला, अनेकांची नोकरी गेली पण या लॉकडाऊनच्या काळात अनेकांनी आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात केली.
लोकेश सिद्ध यांनीही या काळात आपला स्वतचा व्यवसाय सुरुवात करत एक स्टार्ट-अप सुरू केले. कोरोनाच्या काळात पुर्ण देशाता लॉकडाऊन करण्यात आला होता, कोणताच उद्योग चालू नसल्याने आर्थिक चक्र थांबले होते, या कठीण परिस्थितीत सगळ्या लोकांसारखे हातावर हात धरून घरी बसण्यापेक्षा घरूनच काहीतरी उत्पादन निर्माण करण्याचा विचार करून घरातच मशरूम लावण्याचा लोकेश सिद्धने निर्णय घेतला आणि त्यात चांगल उत्पन्न मिळवून आर्थिक चक्राला चालना दिली.नोखा येथील लोकेश सिद्ध यांनी कोरोना काळामध्ये घरी रिकामी बसण्याऐवजी घराच्या एका रिकाम्या खोलीत मशरूम लागवड करून चांगल्या प्रकारचे उत्पादन मिळवले. लोकेश हे कृषी शाखेचे विद्यार्थी आहेत, त्यांनी बीएससी एग्रीकल्चरमध्ये पदवी घेतली असून ते आता पदवीत्तराचे शिक्षणही घेत आहेत.
हेही वाचा : पेरुची शेती करुन यशाला गवसणी; वाचा शितलचा प्रवास
तुम्हाला माहित आहेच की, मशरूम एक स्वादिष्ट आणि पौष्टिक पदार्थ आहे. त्याचा उपयोग ताजा किंवा वाळवून खाण्यासाठी केला जातो. मशरूमच्या प्रकारांपैकी आयस्टर मशरूम एक स्वादिष्ट आणि जलद वाढणारी मशरूम आहे. जगात मशरूमच्या जवळजवळ १४ हजार जाती आहेत. त्यातील ३हजार खाण्यासाठी आणि ४०० जातींमध्ये औषधी गुणधर्म आहेत.
लोकेश यांचे म्हणणे आहे की, कोरोनाच्या काळामध्ये सगळे लोक आपल्या इम्युनिटी पावर बद्दल चिंतित होते. त्यामुळे त्यांनी मशरूमचे उत्पादन हाती घेतले कारण मशरूम एक पौष्टीक तत्वांनी युक्त पदार्थ आहे. मशरूममध्ये उच्च गुणवत्ता युक्त प्रोटीन तसेच डी विटामिन असते. ज्यामुळे कुपोषणाची समस्या दूर केली जाऊ शकते, तसेच मशरूम उत्पादन हे कमी खर्चात आणि कमी वेळात येते. मी एग्रीकल्चरमधून शिक्षण घेतल्याने मला यातच काहीतरी स्टार्ट-अप सुरु करायचे होते. मग मी मशरुम पिकवण्याचा निर्णय घेतला. मशरुमचं उत्पादन घ्यायचं म्हटलं किंवा लागवड करायची म्हटलं तर आपल्याला जागेचा प्रश्न पडत असतो. पण लॉकडाऊनच्या काळात हा प्रश्न सुटणं शक्य नव्हतं.
यामुळे मी घरातच मशरुम पिवकावण्याचं ठरवलं. यासाठी मी माझ्या घरातील एका खोलीत लोखंडी रोलला प्लास्टिक बॅग बाधून याचं उत्पन्न घेतलं. सुरुवातीला लोकेश यांनी ४ किलो मशरुमचं उत्पन्न घेतले आहे. लोकेश म्हणतात की, त्यांनी तीस प्लास्टिक बॅगेत आळंबीची लागवड केली आहे. पुढील दहा दिवसात दुसरी काढणी येणार आहे. मशरुमची काढणी ही आधी ३५ दिवसात येत असते त्यानंतर दुसरी काढणी ही ४५ दिवसांत येत असते. म्हणजेच दोन काढणींमध्ये साधरण १० दिवसांचा फरक पडत असतो.
जर इम्युनिटी आणि तापमान व्यस्थित ठेवले तर आपण चार ते पाच वेळा काढणी करु शकतो. एका किलोची लागवड केल्यानंतर यातून आपण १० ते १२ किलो मशरुम म्हणजे आळंबीचे उत्पन्न घेऊ शकतो, असे लोकेश यांनी सांगितले.
हेही वाचा : काश्मीर अन् केरळपर्यंत पोचली सांगलीच्या बचत गटाची बिस्किटे
लोकेश सिद्ध यांनी आळंबीचं उत्पन्न घेण्यासाठी आपल्या घरी उपलब्ध असलेल्या साधनांचा उपयोग केला. घरातील जनावरांना दिला जाणारा चारा होता. इम्युनिटी आणि तापमान व्यवस्थित ठेवण्यासाठी साखरेच्या पोत्यांचा वापर केला. जर आपल्याला घरीच आळंबीचे उत्पन्न घ्यायचे असेल तर साधरण आपल्याला दोन हजार रुपयांचा खर्च येतो असं लोकेश यांनी सांगितले. या स्टार्ट-अप सुरू करण्यासाठी माझ्या वडिलांनी प्रोत्साहन दिल्याचे लोकेश सांगितले.
सेवानिवृत्त सहाय्यक प्रशासन अधिकारी सादुल नाथ जी यांनी सांगितले की, लॉकडाऊनमध्ये आत्मनिर्भर भारताचा नारा दिला गेला, त्यानुसार मशरूम एक स्वयंरोजगाराचे महत्त्वाचे साधन बनवले जाऊ शकते. महत्वाचे म्हणजे मशरूमची लागवड शेतीमध्येच न करता तुम्ही तुमच्या घराच्या रिकाम्या खोलीत सुद्धा करू शकतात.
Share your comments