आयआयटी इंजिनियरने सुरु केला डेअरी फार्म, अमेरिकेतील गलेलठ्ठ पगाराला मारली लाथ

21 May 2021 04:34 PM By: KJ Maharashtra
डेअरी फार्म  फोटो - इकोनॉमिक्स टाइम्स

डेअरी फार्म फोटो - इकोनॉमिक्स टाइम्स

बरेचसे लोक आपले आरामशीर दैनंदिन रुटीन सोडून वेगळी वाट धरायला धजावत नाहीत. याला अपवाद म्हणजे किशोर इंदू कुरी हे होत. इंदुकुरी हे अमेरिकेमध्ये असलेली त्यांची इंटेल मधील नोकरी सोडून भारतात आले आणि स्वतःला कृषी संबंधित व्यवसायामध्ये झोकून दिले. त्यांनी हैदराबादमध्ये एका सीड्स फार्म च्या नावाने एक डेरी फार्म सुरू केला. या फार्मच्या माध्यमातून त्यांनी सबस्क्रीप्शनच्या आधारे ग्राहकांना शुद्ध दूध पोचवणे सुरू केले.

किशोर इंदुकुरी यांचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांची अमेरिकेमध्ये जाऊन शिक्षण घेण्याची आणि तिथेच नोकरी करण्याची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी आय आय टी खरकपूर येथून इंजीनियरिंग पूर्ण केल्यानंतर एमहर्स्ट मॅसेच्युसेट्स विश्वविद्यालय यामधून पोलिमर सायन्स अँड इंजिनिअरिंग मध्ये मास्टर डिग्री घेतली आणि पीएचडी पूर्ण केल्यानंतर त्यांनी इंटेल मध्ये नोकरी करणे सुरु केले.

नोकरीचे सहा वर्ष

 नोकरीत सहा वर्षे पूर्ण केल्यानंतर त्यांना वाटायला लागले की त्यांची कामाची खरी पॅशन तर कृषी क्षेत्र आहे. कर्नाटक मध्ये त्यांच्या कुटुंबाची थोडी जमीन होती. भारतात आल्यानंतर त्यांनी बऱ्याच शेतकऱ्यांची सल्लामसलत केली, त्यानंतर त्यांनी आपली नोकरी सोडून शेती करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये येत असताना त्यांनी निरीक्षण केले की भेसळ  विरहित स्वच्छ दूध एक चांगला पर्याय आहे. यातूनच त्यांनी डेअरी फार्म सुरू करण्याचा निर्णय घेतला.

 

डेअरी फार्म सुरू केला

 त्यांनी आपल्या स्वतःची डेरी फार्म सुरू केला आणि आपल्या उत्पादनाचा ब्रँड विकसित करण्याच्या बाबतीत विचार केला. यातूनच त्यांनी 2012 मध्ये कोयमतुर येथून वीस गाई खरेदी केल्या व हैदराबाद येथे एक डेरी फार्म स्थापन केला. सबस्क्रीप्शन च्या माध्यमातून त्यांनी शहरातील ग्राहकांना घरपोच दूध पुरवठा सुरू केला. त्यांनी 2016 मध्ये  त्यांचा मुलगा सिद्धार्थ च्या नावावरून सीड चा फार्म रजिस्टर केले. आज मी तिला त्यांच्याकडे 120 कर्मचारी दररोज जवळजवळ एक हजार ग्राहकांना दूध पुरवठा करतात. मागच्या वर्षी त्यांनी जवळजवळ 44 कोटी रुपयांचा व्यवसाय केला.

याबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, हे एवढे सोपे नव्हते. कारण त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना बिजनेस संस्कृती सोबत लवकर परिचित व्हायचे होते अगोदर त्यांनी वीस गाईंच्या माध्यमातून सर्व ग्राहकांना दूध विक्री सुरू केली. त्यांचं लक्ष होतं की जेव्हा लोक सकाळची पहिली चहा किंवा कॉफी घेतील त्यावेळेस त्यांचे दूध  ग्राहकांच्या घरापर्यंत पोहोचलेच  पाहिजे. हा त्यांचा कटाक्ष होता. त्यासाठी त्यांनी सकाळी चार वाजताच दूध काढणी सुरू केली. परंतु कालांतराने ग्राहक वाढल्याने दुधाची मागणी वाढली आणि त्याचा परिणाम असा झाला की त्यांना ग्राहकांना वेळेत पोहोचवणे  एक आव्हान ठरले.

अगोदर त्यांनी गाय आणि म्हशी च्या  दुधाने आपल्या व्यवसायाची  सुरुवात केली. परंतु कालांतराने त्यांनी आपल्या सीड फार्म च्या माध्यमातून गाईच्या दुधाचे तूप, गाईच्या दुधाचे लोणी,  म्हशीच्या दुधाचे तूप तसेच लोणी तसेच गाय आणि म्हशीच्या दुधाचे दही यासोबतच अन्य दुग्ध पदार्थांचे उत्पादन सुरू केले.

आयआयटी इंजिनियर डेअरी फार्म dairy farm IIT engineer dairy business डेअरी व्यवसाय
English Summary: IIT engineer starts dairy farm

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.