1. यशोगाथा

Inspirational: उच्च पदवी असुन देखील वांग्याच्या शेतीतून साधली आर्थिक प्रगती आणि कमवले लाखो रुपये

सध्या आपण जर तरुणाईचा विचार केला तर जे तरुण शिक्षणाच्या बाबतीत उच्च पदवी धारण केलेले असतात असे तरुण शेतीचा विचार करत नाही की इकडे फिरकत सुद्धा नाही अशी साधारण परिस्थिती आपल्याला सगळीकडे दिसते. याला कारणेही तशीच आहेत. जर आपण शेतीचा एकंदरीत विचार केला तर हा एक बिनभरवशाचा आणि निसर्गावर अवलंबून असलेला व्यवसाय असल्यामुळे कायमच अनिश्चितता भरलेली असते.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
brinjaal crop

brinjaal crop

परंतु जर सध्या परिस्थितीचा विचार केला तर शेती आता पारंपारिक राहिली नसून तिला एक व्यावसायिक स्वरूप आले असून शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणि विविध पीक पद्धतींचा वापर केला जात असल्यामुळे शेती आता आधुनिक होऊ लागली आहे.

नक्की वाचा:शेतकऱ्यांसाठी दिलासादायक! बाजारात बाजरीची किंमत वाढली; विकली जातेय 'या' दराने

 त्यामुळे आता हळूहळू का होईना अनेक सुशिक्षित तरुण शेतीकडे करिअर म्हणून बघत असून त्या दृष्टिकोनातून प्रयत्न देखील करीत आहेत.

बरेच तरुण आता फळबागा आणि विविध प्रकारचे भाजीपाला पिकांच्या माध्यमातून तसेच शेडनेट सारख्या तंत्राचा वापर करून खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक प्रगती देखील करीत आहेत. या लेखात अशाच एका सुशिक्षित तरुणाची शेतीतील यशोगाथा आपण पाहणार आहोत.

 उच्चशिक्षित तरुणाची शेतीतील यशोगाथा

 ही यशोगाथा मध्यप्रदेश राज्यातील रीवा येथील नृपेंद्र सिंग यांची असून या शेतकऱ्याने शिक्षण घेत असताना आयटीआय केले व नोकरी मिळत नसल्यामुळे शेतीत करियर करण्याचा विचार केला.

ते जेव्हा शेतीमध्ये आले तेव्हा ते पारंपरिक पिकांची लागवड करून शेती करायला लागले परंतु त्या माध्यमातून त्यांना उत्पादन देखील चांगले मिळाले परंतु त्यांना जेवढे उत्पन्न अपेक्षित होते तेवढे त्यांना मिळत नव्हते.

त्यामुळे त्यांनी थोडासा विचार करून बागायती पिकाकडे वळण्याचा निर्णय घेतला.परंतु याची सुरुवात करताना काय करावे हा मोठा प्रश्न त्यांच्याकडे होता.म्हणून त्यांनी अगोदर यामध्ये कृषीतज्ञांचा सल्ला घेतला आणि 2019 मध्ये भाजीपाला पिकांची शेती करायला सुरुवात केली.

ही सुरुवात करताना त्यांनी अगोदर फ्लॉवर कोबी आणि वांगी या सारखी पिके घ्यायला सुरुवात केली व त्या माध्यमातून ते चांगले आर्थिक उत्पन्न मिळवू लागले.  जर त्यांचा आजचा विचार केला तर अवघ्या भाजीपाला लागवडीच्या माध्यमातून ते एका वर्षाला सहा लाख रुपयांपर्यंत कमाई करतात.

नक्की वाचा:शेतकऱ्यांनो लवंग, वेलची 'या' मसाला पिकांची शेती करून कमवा लाखों रुपये; जाणून घ्या

 कशी करतात वांग्याची शेती?

 नृपेंद्र  एक एकर क्षेत्रामध्ये वांगे लागवड करतात. अगोदर जमिनीची चांगली नांगरट करून रोटावेटर मारून ती जमीन चांगली भुसभुशीत करतात व नंतर यंत्राच्या साहाय्याने वांग्याची लागवड करण्यासाठी व्यवस्थित पद्धतीने बेड तयार करतात.

बेड तयार झाल्यानंतर नर्सरी मधुन सुधारित व दर्जेदार वानांच्या वांग्याची रोपे आणून त्याची लागवड करतात. परंतु लागवड करण्याआधी ते बेडवर डीएपी या खताचा वापर करतात.

त्यामुळे त्यांना अधिक उत्पादन मिळत असल्याचे देखील ते आवर्जून नमूद करतात. जर त्यांच्या वांग्याच्या उत्पन्नाचा विचार केला तर या माध्यमातून ते तीन ते चार लाख रुपयांची कमाई अगदी आरामात करतात.

वांग्यासोबत ते फुलकोबी देखील लागवड करतात व त्या माध्यमातून त्यांना 50 हजारांपर्यंत उत्पन्न मिळते. एवढेच नाही तर मुळा लागवड करून व्यवस्थित नियोजनाने मुळा शेतीच्या माध्यमातून ते वार्षिक 60 हजारांपर्यंत कमाई करतात.

या भाजीपाला पिकांची शिवाय ते शेतामध्ये कांद्याची देखील लागवड करतात. म्हणजेच आपण एकंदरीत त्यांच्या शेतीचा विचार केला तर एकच पीक न लावता ते वेगवेगळ्या पिकांची लागवड करतात.  त्यांच्याकडे  दहा एकर क्षेत्र असून हंगामानुसार ते गहू आणि भात यासारख्या पिकांचे देखील लागवड ते करतात.

नक्की वाचा:मोठी वेलची शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणार; शेतकरी होणार मालामाल

English Summary: htis farmer is higher educated but choose career in farming and earn more profit through brinjaal cultivation Published on: 05 October 2022, 11:02 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters