1. यशोगाथा

लई भारी! 'या' शेतकऱ्याने डाळिंब बागात घेतले कांद्याचे आंतरपीक; आणि…….!

गेल्या अनेक वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे तसेच सुलतानी दडपशाहीमुळे शेतकरी राजा मेटाकुटीला आला असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. कधी अवकाळी, कधी गारपीट, कधी ढगाळ वातावरण, कधी दाढ धुके, तर कधी शीतलहरीचा कहर यामुळे बळीराजा हतबल झाला असून त्याला अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. यामुळे अनेक युवक शेतकऱ्यांचा शेती ही केवळ तोट्याचीच असते असा समज झाला आहे पण या असंख्य युवक शेतकऱ्यांच्या गैरसमजुतीला पुणे जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने पूर्णविराम लावून दिला आहे.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
onion

onion

गेल्या अनेक वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे तसेच सुलतानी दडपशाहीमुळे शेतकरी राजा मेटाकुटीला आला असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. कधी अवकाळी, कधी गारपीट, कधी ढगाळ वातावरण, कधी दाढ धुके, तर कधी शीतलहरीचा कहर यामुळे बळीराजा हतबल झाला असून त्याला अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. यामुळे अनेक युवक शेतकऱ्यांचा शेती ही केवळ तोट्याचीच असते असा समज झाला आहे पण या असंख्य युवक शेतकऱ्यांच्या गैरसमजुतीला पुणे जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने पूर्णविराम लावून दिला आहे.

जिल्ह्याच्या पळसदेव भागातील मौजे माळवाडी येथील एका शेतकऱ्याने डाळिंबाच्या बागात कांद्याचे आंतरपीक घेऊन चांगले उत्पन्न प्राप्त केले आहे. या शेतकऱ्याने प्राप्त केलेले हे यश इतर शेतकऱ्यांना शेती ही तोट्याची नसून फायद्याची देखील आहे हे दाखवून दिले.

हेही वाचा:-युट्युबचा असाही होतोय फायदा! युट्युब व्हिडीओ बघून या युवक शेतकऱ्याने माळरानावर लावली सीताफळची बाग; आता घेतोय लाखोंचे उत्पादन

मौजे माळवाडी येथील तुकाराम बनसोडे या शेतकऱ्याने डाळिंबाच्या बागात कांद्याचे आंतरपीक घेण्याची किमया साधली आहे. मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, याचा पळसदेव भागात असे शेकडो शेतकरी आहेत ज्यांनी तेल्या रोग आला कंटाळून आपल्या डाळिंबाच्या बागा उद्ध्वस्त केल्या आहेत. मात्र तुकाराम यांनी परिसरात नामशेष होत असलेल्या डाळिंब बागातूनच दर्जेदार उत्पन्न मिळवण्याचे ठरवले आहे त्या अनुषंगाने तुकाराम यांनी डाळिंबाची लागवड केली आहे.

जसं की आपणास ठाऊक आहे डाळिंब लागवड केल्यापासून सुमारे दीड वर्षानंतर डाळिंबाच्या पिकापासून उत्पादन मिळण्यास सुरवात होते. तोपर्यंत डाळिंबाच्या बागा जोपासण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च अपेक्षित असतो. हा खर्च भागवण्यासाठी तुकाराम यांनी एक नामी शक्कल लढवीत डाळिंबाच्या बागेतच कांद्याचे आंतरपीक घेऊन हा खर्च भागविण्याचा निश्चय केला. मात्र पहिल्या वर्षी तुकाराम यांचा हा प्रयोग उलटा पडला आणि केलेला खर्च देखील त्यांना निघाला नाही.

हेही वाचा:-तिनं करून दाखवलं! वडिलांची शेती सांभाळत उमा करतेय लाखोंची उलाढाल

मात्र, तुकाराम यांनी न खचता पुन्हा एकदा कांद्याची लागवड केली. आता तुकाराम यांचे कांद्याचे पीक चांगले बहरले असून यापासून त्यांना चांगले दर्जेदार उत्पादन प्राप्त होण्याची आशा आहे. सध्या कांद्याला विक्रमी दर मिळत नसला तरी समाधानकारक बाजार भाव मिळत असल्याचे सांगितले जात आहे.

सध्या कांद्याला 20 ते 25 रुपये प्रति किलो असा दर मिळत आहे जर असाच दर कायम राहिला तर तुकाराम यांना लाखो रुपयांचे उत्पन्न मिळणार अशी आशा देखील आहे. मिश्र शेती ही शेतकरी बांधवांसाठी एक वरदान सिद्ध होऊ शकते असे तुकाराम यांचे म्हणणे आहे. तुकाराम यांना या कांद्याच्या आंतरपिकासाठी सुमारे 90 हजार रुपये खर्च आला आहे. आणि यातून जवळपास चारशे ते पाचशे पिशव्या कांद्याचे उत्पादन होण्याची त्यांना आशा आहे. एकंदरीत, मिश्र पीक पद्धतीने शेती करण्याचा त्यांचा निर्णय हा खरा ठरला आहे आणि आगामी काही दिवसात त्यांना कांद्याच्या आंतरपिकातून चांगले विक्रमी उत्पन्न प्राप्त होऊ शकते.

हेही वाचा:-लई भारी राजा! 'या' हुन्नरी शेतकऱ्याने घेतले हेक्टरी 40 क्विंटल हरभऱ्याचे उत्पादन

English Summary: Heavy! This farmer intercrops onion in pomegranate orchard; And.! Published on: 15 March 2022, 11:27 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters