विदर्भातील एका तरुण शेतकऱ्याने जी शेती केलेली आहे ती शेती सध्या चर्चेचा विषय ठरलेली आहे. विदर्भ म्हणले की आधीच पाण्याची टंचाई मात्र मागील दोन वर्षांपासून हा तरुण त्या जागेत न घेता येणाऱ्या पिकाची शेती करत आहे आणि त्यामधून उत्पन्न सुद्धा चांगल्या प्रकारे काढत आहे. विदर्भात अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील नायगाव बोर्डी या गावांमध्ये राहणार शेतकरी राहुल उपासे.
शेतकरी वर्गात एका आदर्श निर्माण केला:
राहुल उपासे या तरुण शेतकऱ्याचे शिक्षण पदवी पर्यंत झालेले आहे मात्र त्याने आपला कल नोकरी कडे न ओळवता शेती कडे ओळवला.राहुल उपासे एक उच्च शिक्षित तरुण आहे आणि त्याने आपल्या शेतीमध्ये एक वेगळीच कल्पना लढवल्यामुळे तेथील शेतकरी वर्गात एका आदर्श निर्माण केलेला आहे.
जे कोणाला अजून पर्यंत त्याच्या भागात जमलेलं नाही ते राहुल उपासे यांनी करून दाखवले आहे. आज च्या घडीला राहुल त्याच्या शेतीमधून नोकरीपेक्षा जास्तीत जास्त पैसा कमवत आहे.
हेही वाचा:कोरोना काळात नांदेड मधील शेतकऱ्याने नारळाच्या बागेतून कमावले लाखो रुपये
एकंदरीत विदर्भात ज्या पिकाची लागवड करणे अशक्य च आहे त्या पिकाची लागवड राहुल उपासे यांनी त्यांच्या शेतामध्ये मागील दोन वर्षांपासून करत आहे.राहुल उपासे या तरुण शेतकऱ्याकडे जास्त शेती पण नाही मात्र त्यांच्या दोन एकर शेतीमध्ये एक आगळा-वेगळा प्रयोग करून उत्पन्न घेतलेले आहे.
मागील दोन वर्षांपासून राहुल उपासे या शेतकऱ्याने त्याच्या दोन एकर शेतीमध्ये हळदीचे पीक घेतले आहे. हळदीच्या पिकास जसे वातावरण लागते किंवा ज्याप्रकारे शेती लागते त्या प्रकारे त्याने कल्पना लढवून आपल्या शेतीमध्ये हळदीचे पीक लावले आहे आणि जवळपास त्यामधून राहुल उपासे लाखो रुपयांची उलाढाल करत आहेत.
जेव्हापासून राहुल उपासे हळदीचे पीक घेऊ लागले तेव्हा त्यांना पहिल्यांदा काही संकटांना सामना करावा लागला पण त्यामधून अगदी जिद्ध आणि चिकाटीने मार्ग मोकळा करून त्यांनी हळदीमधून चांगले पैसे कमवण्यास चालू केले.आज पाहायला गेले तर तेथील परिसरातील शेतकरी वर्ग राहुल कडे येऊन त्यांनी केलेल्या आगळ्या-वेगळ्या प्रयोगाबद्धल माहिती घेत आहेत जे की राहुल उपासे हा तरुण तेथील परिसरात एक आपला आदर्श निर्माण करत आहेत.त्याच्या या प्रयोगातून आपल्याला सुद्धा एक समज भेटतो जो की आपल्यात जिद्ध आणि चिकाटी असेल तर आपण सुद्धा असे वेगवेगळे प्रयोग वापरून शेती करू शकतो.
Share your comments