आधुनिक पद्धतीने शेती केली तर उत्पादनात वाढ होते असे काही नाही त्यासाठी योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. पानांची शेती करणे तसे जुने आहे जे की याकडे कोण लक्ष देखील देत नाही. एखादे पीक शेतात पेरले की लगेच उत्पादनाची गणिते मांडली जातात.नांदेड जिल्ह्यातील बारड परिसरातील प्रकाश बोले हे शेतकरी मागील २० वर्षांपासून नागेलीच्या पानांची शेती करत आहेत. प्रकाश बोले यांचा पान मळ्याचा व्यवसाय आहे. सध्या बोले त्यांच्या २० गुंठा जमिनीमध्ये नागेली च्या वेलांची लागवड केली आहे. यामधून १० कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो असे त्यांनी सांगितले.
अशी आहे लागवड पध्दत :-
२० गुंठा शेतीमध्ये बोले यांनी ५ फूट अंतर ठेवून बेड तयार केले जे की या बेडवरती शेवरी आणि शेवगा च्या झाडांची लागवड केली. नागेलीच्या वेलांची वरती पर्यंत वाढ करण्यासाठी ही दोन झाडे मदत करतात. या दोन झाडांच्या सावलीमुळे पानांना सुरक्षा देखील भेटते. 1 महिन्याने तयार झालेल्या नागेलीची रोपे बेडवर लावण्यात आली. जुलै महिन्यात एक ते दीड फूट अंतर ठेवून या रोपांची लागवड करण्यात आली. ६ महिन्यानंतर रोपांना नागेलीचची पाने फुटण्यास सुरुवात झाली. एकदा लागवड केली की तीन वर्षे यामधून उत्पन्न भेटते. कोणत्याही रासायनिक खतांचा तसेच कीटकनाशकांचा वापर यासाठी होत नाही.
कमी खर्चात अधिकचे उत्पन्न :-
जरी पान मळ्याचा व्यवसाय पारंपरिक असला तरी आधुनिक पद्धतीने याचा वापर वाढला आहे. बोले हे पारंपरिक पद्धतीने नागिलीच्या पानांचे पीक घेत असल्यामुळे ते याची रोपे घरीच तयार करत आहेत. यामुळे खर्च देखील वाचला आहे आणि उत्पादनात देखील वाढ झालेली आहे. क्षेत्र देखील कमी असल्यामुळे निगराणी देखील होत आहे. बोले याना सर्व खर्च जाऊन वर्षाकाठी ३ लाख रुपये भेटतात.
बदलत्या काळातही पानाला मागणी :-
गुटखा च्या मागणीत वाढ झाली असल्याने पानांच्या मागणीत घट झाली आहे मायर पानमळ्याचे आजूनही मर्यादित आहे. ग्रामीण भागातील नागरिक जास्त करून पान खातात. मनमाड, भुसावळ सोबतच नांदेड, परभणी,लातूर या जिल्ह्यात बोले यांच्या पानांना मोठी मागणी आहे.
Share your comments