गेल्या अनेक वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती व्यवसाय तोट्यात जातं आहे. यामुळे शेतकरी बांधवांना लाखो रुपयांचा फटका बसत आहे. नैसर्गिक संकटाशिवाय गेल्या अनेक वर्षांपासून बळीराजा सुलतानी दडपशाहीमुळे तसेच शेतमालाला मिळत असलेल्या कवडीमोल दरामुळे आर्थिक कोंडीत सापडला आहे. मात्र असे असले तरी या संकटाच्या काळात काही शेतकरी शेती व्यवसायातून चांगली कमाई करत आहेत.
यामुळे निश्चितचं शेतकऱ्यांना प्रेरणा मिळतं असते. बीड जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने देखील शेतीमध्ये बदल करत नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून लिंबाची शेतीतून लाखो रुपयांची कमाई केली आहे. जिल्ह्यातील शिरूर येथील रहिवाशी शेतकरी भाऊराव तळेकर यांनी लिंबाची शेती सुरु केली आणि अवघ्या तीन महिन्यात अडीच लाखांची कमाई केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
Watermelon Farming : टरबूज शेती करा आणि कमवा बक्कळ पैसा; वाचा याविषयी
Desi Jugad : पिकाच्या संरक्षणासाठी लातूरच्या शेतकऱ्याचा भन्नाट जुगाड! राज्यात सर्वत्र याचीच चर्चा
भाऊराव यांनी आपल्या एक एकर बागायती शेतजमिनीत पारंपरिक पिकाला फाटा देत लिंबाची शेती सुरू केली. भाऊराव यांनी लिंबाची शेती 2014 मध्ये सुरु केली. एका एकरात त्यांनी जवळपास 134 लिंबाची झाडे लावली.
सुरवातीला लिंबाच्या शेतीला चांगले सांभाळले आणि आता यातून त्यांना चांगला नफा मिळतं आहे. भाऊराव यांनी सांगितले की, पावसाळ्यात आणि हिवाळ्यात लिंबाच्या पिकातून एवढे उत्पन्न मिळत नाही कारण या काळात लिंबाला अतिशय कमी मागणी असते. मात्र उन्हाळ्यात त्यातून चांगले उत्पन्न मिळते. या उन्हाळ्यात लिंबाला तर नेहमीपेक्षा अधिक मागणी होती. या वर्षी लिंबाला तब्बल 180 रुपये किलो असा भाव मिळाला. मे महिन्यात यात अजून वाढ होणार असल्याचा भाऊराव यांचा अंदाज आहे.
भाऊराव यांनी लावलेल्या लिंबाच्या एका झाडाला यावर्षी किमान दीड ते दोन हजार लिंबाचे फळ आले होते. विशेष म्हणजे त्याचा तोडा घरच्या घरीच करत असल्याने मजुरीचा खर्च वाचला. शिवाय स्थानिक बाजारपेठेत हॉटेल, ज्युस, बार रसवंती, खानावळी, धाबे, स्थानिक बाजार इत्यादी ठिकाणी लिंबाची विक्री केली.
दिवसाला 30 किलोपर्यंत माल विकला. यामुळे त्यांना तीन महिन्यांत लिंबाने दोन सव्वादोन लाख उत्पन्न मिळाले यामुळे संसाराला हातभार लागला असल्याचे भाऊराव यांनी सांगितले. निश्चितच अवघ्या तीन महिन्यात भाऊराव यांना लिंबाच्या शेतीने लखपती बनवले.
Share your comments